बाहुबली मूर्तीवर अखंड पंचामृत अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:14 AM2018-02-19T01:14:36+5:302018-02-19T03:21:13+5:30
त्याग आणि समतेचा संदेश देणाºया श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवामध्ये रविवारी १00८ कलशांनी मस्तकाभिषेक करण्यात आला.
भरत शास्त्री
श्रवणबेळगोळ (कर्नाटक) : त्याग आणि समतेचा संदेश देणाºया श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवामध्ये रविवारी १00८ कलशांनी मस्तकाभिषेक करण्यात आला. भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती महाराज, १0८ वर्धमानसागर महाराज व पुष्पदंत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
१२ वर्षांतून होणाºया महोत्सवास हजारो भाविकांनी कलशांचे सवाल घेऊन उपस्थिती लावली आहे. कलशधारकांच्या केशरी वस्त्रांनी संपूर्ण मंदिर परिसर केशरिया रंगात न्हाऊन गेला होता. सकाळी अभिषेकास सुरुवात झाली. मुख्य विंध्यगिरी पर्वतासमोरील चंद्रगिरी पर्वतावरदेखील भद्रबाहु गुंफा व नवव्या, दहाव्या शतकातील अन्य मंदिरांत दर्शनासाठी गर्दी झाली होती. १0८ चिन्मयसागर महाराजांचे दर्शनही भाविकांनी या डोंगरावर घेतले.
दानाची सर्व रक्कम श्रवणबेळगोळचा विकास व लोकहिताच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याचे चारुकीर्ती महास्वामी यांनी सांगितले.
महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. ते २00 बेडच्या प्रशस्त रुग्णालयाची पायाभरणी करणार आहेत. त्याचबरोबर गोमटेश्वर भगवान बाहुबली मूर्तीकडे डोंगरावर जाण्यासाठी केलेल्या पायºयांच्या तिसºया टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत.