अभिजित कोळपे बातमी : पाटस-बारामती मार्गाची शीघ्रगतीने खड्डे दुरुस्ती
By Admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:55+5:302015-02-14T23:50:55+5:30
पंतप्रधान दौर्याची पार्श्वभूमी : रस्ता चकाचक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान
प तप्रधान दौर्याची पार्श्वभूमी : रस्ता चकाचक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान वासुंदे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौर्याच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेला पाटस-बारामती रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने शीघ्रगतीने खड्डे भरून काढल्याने काहीअंशी तो चकाचक झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाटस-बारामती रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांनी वेळोवेळी मांडूनदेखील पूर्ण होत नव्हता. तो मोदी यांच्या एका दौर्यात काही प्रमाणात मार्गी लागल्याने मोदी वर्षातून एकदा तरी बारामती दौर्यावर यावेत, अशी चर्चा गावपातळीवरील चव्हाट्यावर सुरू असून, याबाबत ग्रामस्थांत चर्चेचा विषय बनला आहे.या मार्गावरील बारामती फाटा ते वासुंदेपर्यंतच्या मार्गावर लहान मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची पूर्ण चाळणच झालेली होती. त्यामुळे हा रस्ता प्रवासासाठी अगदीच खडतर झाला होता. यातच या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामास सुरुवात होऊनही अद्याप हे काम पूर्णत्वास गेलेले नसल्याने नव्याने डांबरीकरण झालेला भाग सोडला, तर उर्वरित रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले होते. या मार्गावरून धावणार्या वाहनांचे पार्ट तर निखळत होते. परंतु प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, गेली अनेक दिवस सर्वसामान्य जनतेच्या प्रवासास खडतर झालेल्या या मार्गाची मोदी यांच्या दौर्याच्या निमित्ताने बारामतीला जाणार्या शासकीय अधिकारी, पदाधिकारी व खास मान्यवरांच्या सोईसाठी संबंधित विभागाने अत्यंत कमी वेळात या मार्गावरील खड्डे बुजवून आपली मोहीम फत्ते केली.चौकटसुसाट गाड्यांचा धुरळा शनिवार (दि.१४) रोजी अगदी सकाळपासूनच या मार्गावरून लाल व निळ्या अंबर दिव्यांच्या गाड्यांबरोबरच इतर आलिशान गाड्या सुसाट वेगाने धावत होत्या. मात्र, या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणार्या प्रवाशांबरोबरच सर्वसामान्य जनतेला सुसाट धावणार्या गाड्यांचा धुरळा पाहायला मिळाला. फोटो ओळ : पाटस-वासुंदे-बारामती या मार्गावरील पंतप्रधान दौर्याच्या पार्श्वभूमीवर केलेली खड्डे दुरुस्ती. (छायाचित्र : गोरख जांबले)14022014-िं४ल्लि-1414022014-िं४ल्लि-15