अभिजित कोळपे बातमी : विनोदी नाटकातून स्वच्छतेचे पटवले महत्त्व
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:02+5:302015-02-14T23:51:02+5:30
वार्षिक स्नेहसंमेलन : कुरकुंभला विविध सांस्कृतिक कार्यक्रम
Next
व र्षिक स्नेहसंमेलन : कुरकुंभला विविध सांस्कृतिक कार्यक्रम कुरकुंभ : पारंपरिक लोकनृत्यासह हिंदी-मराठी चित्रपटांतील गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली, तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विनोदी नाटकातून स्वच्छ भारत अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन यांबाबत मनोरंजनातून प्रबोधन केले. येथील प्राथमिक शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच जयश्री भागवत यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी ????कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या प्रसंगी उपसरपंच अरुण भागवत, सनी सोनार, रशीद शेख, अरुण साळुंके, सविता गोरे, तारा गायकवाड, वैशाली गिरमे, राहुल भंडलकर, वैजयंता भोसले, सुनील पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब खंडाळे, मुख्याध्यापिका अलका ढेरे, फिरंगाई माता विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासाहेब भापकर उपस्थित होते. शांताराम जगताप यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ शिंदे यांनी आभार मानले. फोटो ओळ : कुरकुंभ येथील प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनात नृत्य करताना विद्यार्थी. (छायाचित्र : रिजवान शेख) 14022014-िं४ल्लि-06