अभिजित कोळपे बातमी : ढमाले मळा येथे बिबट्या जेरबंद
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:50+5:302015-02-14T23:51:50+5:30
Next
>नागरिकांची गर्दी : माणिकडोह निवारण केंद्रात बिबट्या दाखलमढ : ढमाले मळा येथे वनविभागाकडून शुक्रवारी लावण्यात आलेल्या पिंजर्यात बिबट्या (मादी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंजर्यात अडकला. या वेळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.उदापूरचे वनरक्षक एस. जी. मोमीन यांनी सांगितले, की उदापूर, मांदारणे, अहिनवेवाडी, गोटीशीवार, सारणी या परिसरात वारंवार दुचाकीचालकांवर बिबट्याकडून हल्ले होत होते. त्यामुळे वनविभागाकडून पाहणी करून पिंजर्याची जागा वारंवार बदलली जात असे. त्यानुसारच गुरुवारी (दि. १२) ढमाले मळा येथे रात्री बिबट्याने हल्ला केल्याने शीतल जगताप या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे वनविभागकडून ढमाले मळा येथे पाहणी करून शुक्रवारी (दि. १३) नितीन अहिनवे यांच्या शेतात पिंजरा लावून त्यात सावज म्हणून मेंढी ठेवली होती. त्याच रात्री साडेनऊला बिबट्या पिंजर्यात अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनपाल एस. बी. महाले, एस. डी. वायभासे, सी. एस. कांबळे, एन. एम. खताळ व वनरक्षक एस. मोमीन, सी. नलावडे, के. एस. नायकोडी, जाधव, पारधी, केदार, गुफेकर, गंवादे घटनास्थळी पोहोचले.या बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात रात्रीच हलवण्यात आले. बिबट्या मादी जातीचा असून बिबट्याचे बछडे तेथेच फिरत असावेत, म्हणून परत त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. ढमाले मळा ा ठिकाणी पिंजर्यात अडकलेला बिबट्या अंदाजे चार वर्षांचा असावा, असे वनविभागातर्फे सांगण्यात आले.चौकटआतापर्यंत तीन महिला जखमीसुनीता गणेश महाकाळ, बाळासाहेब बबन महाकाळ, शीतल जगताप यांना या परिसरात बिबट्याने आतापर्यंत जखमी केले होते. त्यामुळे उदापूर, ढमाले मळा, मांदारणे, अहिनवेवाडी, सारणी, गोटीशिवार या परिसरात बिबट्याची दहशत होती.वनविभागाचे नागरिकांकडून अभिनंदनगुरुवारी रात्री एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्या स्थळाची पाहणी करून शुक्रवारीच पिंजर्याची जागा बदलली व त्याच रात्री बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे नागरिकांकडून वनविभागाचे अभिनंदन केले जात आहे.फोटो ओळी : पिंजर्यात कैद झालेला बिबट्या (मादी).