बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन यांचा होणार वीर चक्र पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 11:08 AM2019-08-08T11:08:30+5:302019-08-08T11:08:42+5:30

केंद्र सरकार भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्रानं सन्मानित करू शकते.

Abhinandan Varthaman, Balakot pilots to get top military honours | बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन यांचा होणार वीर चक्र पुरस्कारानं सन्मान

बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन यांचा होणार वीर चक्र पुरस्कारानं सन्मान

Next

नवी दिल्लीः केंद्र सरकार भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्रानं सन्मानित करू शकते. बऱ्याच दिवसापासून त्यांना वीर चक्र पुरस्कार बहाल करण्यात येणार असल्याची अटकळ बांधली जात होती. एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली होती.

आता केंद्र सरकारनं बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन यांचा वीर चक्रानं सन्मान करणार असल्याची चर्चा आहे. तसेच ज्या वैमानिकांनी दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत केलं आहे. त्या पाच सर्वश्रेष्ठ वैमानिकांचा हवाई दलाच्या सन्मान चिन्हानं सत्कार करण्यात येणार आहे. मिग-21 बायसन विमानानं एफ-16ला खाली पाडल्यानं हा जगभरात भारताच्या नावावर इतिहास आहे. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले. भारतील लष्कर, अतिसुरक्षित रेडिओ फ्रिक्वेन्सी (विद्युतचुंबकीय लहरी कंपन) आणि संवेदनशील लॉजिस्टिक (कुमक आणि रसदची व्यूहरचना) ही महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला.

भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ 16 हे विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग 21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते. 

Web Title: Abhinandan Varthaman, Balakot pilots to get top military honours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.