ही माझी शिकार,असं सांगत अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 च्या उडवल्या ठिकऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 12:20 PM2019-03-02T12:20:35+5:302019-03-02T14:09:26+5:30

भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावतान अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याची अजून एक गाथा समोर आली आहे.

Abhinandan Varthaman Destroy Pakistani F_16 Plane in Just 86 Seconds | ही माझी शिकार,असं सांगत अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 च्या उडवल्या ठिकऱ्या 

ही माझी शिकार,असं सांगत अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या एफ-16 च्या उडवल्या ठिकऱ्या 

Next
ठळक मुद्देभारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावतान अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याची अजून एक गाथा समोर मिग -21 विमान घेऊन मोहिमेवर निघालेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी समोर पाकिस्तानी एफ-16 विमान दिसताच ही माझी शिकार आहे असा संदेश सहकाऱ्यांना दिलाअवघ्या 86 सेकंदात अभिनंदन यांनी एफ-16 विमानाच्या ठिकऱ्या उडवल्या

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री सुखरूपरीत्या मायभूमीत परतले आहेत. दरम्यान, भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावतान अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याची अजून एक गाथा समोर आली आहे. मिग -21 विमान घेऊन मोहिमेवर निघालेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी समोर पाकिस्तानी एफ-16 विमान दिसताच ही माझी शिकार आहे असा संदेश सहकाऱ्यांना दिला आणि पुढच्या 86 सेकंदात या विमानाच्या ठिकऱ्या उडवल्या, अशी माहिती आता समोर आली आहे. 

त्याबाबतची सविस्त हकिकत अशी,  पाकिस्तानच्या अत्याधुनिक एफ-16 विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यावर भारताच्या हवाई दलाची विमाने हवेत झेपावली. बघता बघता नौशेरा विभागातील आकाशात भारत आणि पाकिस्तानच्या विमानांमध्ये चकमक सुरू झाली. कुरघोडी आणि हुलकावण्यांचे खेळ सुरू झाले. याला हवाई युद्धाच्या भाषेत डॉग फाइट म्हटले जाते. 

मिग-21 विमान उडवत असलेल्या अभिनंदन वर्धमान यांनी 15 हजार फूट उंचीवर असताना पाकिस्तानचे एफ-16 विमान पाहिले. ते विमान तेव्हा 8 हजार फूट उंचीवर होते. एकमेकांना झुकांड्या देण्याचा खेळ 26 हजार फूट उंचीपर्यंत पोहोचला. त्याचवेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ -16 विमानावर आर-73 क्षेपणास्त्र डागले. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एफ-16 विमानाच्या वैमानिकाने उच्च क्षमतेचा फायदा घेत मिग-21 विमानावर प्रतिवार केला. या चकमकीत दोन्ही विमाने कोसळली.

सुदैवाने अभिनंदन वर्धमान हे प्रसंगावधान राखून विमानातून बाहेर पडले. मात्र हवेच्या झोतामुळे त्यांचे पॅराशूट पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचल्याने. ते पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. दरम्यान,  विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून भारतात परतले. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन केले.  

Web Title: Abhinandan Varthaman Destroy Pakistani F_16 Plane in Just 86 Seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.