नव्या रूपात- नव्या जोशात अभिनंदनची 'भरारी';हवाईदल प्रमुखांसोबत मिग २१मधून उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 02:12 PM2019-09-02T14:12:28+5:302019-09-02T14:38:36+5:30

भारतीय हवाई दलाचे अभिनंदन वर्धमान यांनी आज(सोमवारी) गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मिग- २१ विमानातून पुन्हा एकदा अवकाशात भरारी घेत सैन्यात दाखल झाले आहेत.

Abhinandan Varthman First Time Flies Mig- 21 After Balakot Air Strike Incident | नव्या रूपात- नव्या जोशात अभिनंदनची 'भरारी';हवाईदल प्रमुखांसोबत मिग २१मधून उड्डाण

नव्या रूपात- नव्या जोशात अभिनंदनची 'भरारी';हवाईदल प्रमुखांसोबत मिग २१मधून उड्डाण

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आज (सोमवारी) गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मिग- २१ विमानातून पुन्हा एकदा अवकाशात भरारी घेत सैन्यात दाखल झाले आहेत. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर तब्बल सहा महिन्यांनी हवाई दलाचे प्रमुख बी.एस.धनोआ यांच्यासोबत अभिनंदन यांनी पठाणकोट एअरबेसवरुन मिग- २१ मधून उड्डाण केलं.

भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ १६ ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ १६ हे विमान पाडलं होतं. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग २१ हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते. 

तसेच अभिनंदन याने २७ फेब्रुवारीला दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय हवाई दलाकडून शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

 

Web Title: Abhinandan Varthman First Time Flies Mig- 21 After Balakot Air Strike Incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.