#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 03:29 PM2019-02-28T15:29:01+5:302019-02-28T15:29:15+5:30

पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे.

#AbhinandanMyHero ... Wing Commander Congratulates Social Media and pressure on government for release to varthman | #AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला

#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला

googlenewsNext

पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवून लावताना पाकिस्तानच्या हद्दीत अडकलेले विंग कमांडर वर्धमान यांच्या सुटकेसाठी सोशल मीडियावर नेटीझन्सन मोहीम सुरू केली आहे. #AbhinandanMyHero, #अभिनंदन #GiveBackAbhinandan असे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. तसेच भारत सरकारने कुठल्याही परिस्थिती अभिनंदला परत आणावे, अशी भावनाही नेटीझन्सकडून व्यक्त होत आहे. तर, अभिनंदन यांच्या शौर्याला सॅल्यूट करण्यात येत आहे.
  
पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताशी चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. तत्पूर्वी भारतीय नागरिकांनी सरकारवर दबाव वाढवला असून अभिनंदनला परत आणण्याच मागणी केली आहे.

#AbhinandanMyHero, #अभिनंदन #GiveBackAbhinandan असे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. तर फेसबुक, इंस्टाग्राम येथेही अभिनंदनच्या नावानेच दिवसाची सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. एका व्हायरल व्हिडीओत पाकिस्तानी सैन्यापुढे अभिनंदन ज्या धाडसाने बोलला, त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अभिनंदनने आपली माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे अभिनंदन हाच भारताचा खरा हिरो असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. त्यामुळेच #AbhinandanMyHero हा हॅशटॅगही ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ यांनीही अभिनंदनच्या सुटकेसाठी प्रार्थना केली असून बॉलिवूडच्या अभिनंदनच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, अभिनंदन वर्धमान यांच्या वडिलांनीही मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल देशावासीयांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक संदेश लिहिला आहे. अभिनंदन वर्धमान यांचे वडील सिमहाकुट्टी वर्धमान भारतीय हवाई दलातून एअर मार्शल म्हणून निवृत्त झाले. सिमहाकुट्टी वर्धमान यांनी संदेशात म्हटले आहे की, 'मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, मानसिकदृष्ट्या ठीक आहे. तो ज्या धाडसाने बोलत आहे ते पाहा....एक खरा जवान.... आम्हाला त्याचा अतिशय अभिमान आहे'. याचबरोबर, महत्वाच्यावेळी सर्वांनी सोबत दिल्याबद्दल आपला आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला बळ मिळत आहे, असेही सिमहाकुट्टी वर्धमान यांनी म्हटले आहे.
 

Web Title: #AbhinandanMyHero ... Wing Commander Congratulates Social Media and pressure on government for release to varthman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.