ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशाला व्यवस्थाच कारणीभूत - अभिनव बिंद्राचे टीकास्त्र

By Admin | Published: August 17, 2016 08:24 AM2016-08-17T08:24:20+5:302016-08-17T09:19:19+5:30

ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशसाठी येथील व्यवस्थाच जबाबदार आहे अशी टीका भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राने केली आहे.

Abhinav Bindra's criticism for the cause of India's failure in the Olympics | ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशाला व्यवस्थाच कारणीभूत - अभिनव बिंद्राचे टीकास्त्र

ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशाला व्यवस्थाच कारणीभूत - अभिनव बिंद्राचे टीकास्त्र

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकांचे खाते अद्याप खुले झाले नसून त्याबाबत चहुबाजूंनी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ' मात्र ऑलिम्पिकमधील भारताच्या अपयशसाठी येथील व्यवस्थाच जबाबदार आहे' अशी टीका भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राने केली आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देणा-या अभिनवला यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मात्र पदक जिंकण्यात अपयश आले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये 10 मी. एअर रायफल इव्हेंटमध्ये अभिनव चौथ्या स्थानी राहिला होता, त्यामुळे त्याचं पदक थोडक्यात हुकलं होतं.
मंगळवारी ट्विटरवरून अभिनवने पदकांच्या अपेक्षेबाबत मत व्यक्त केले. आपल्या ट्विटमध्ये ब्रिटनचे उदाहरण देत बिंद्राने म्हटले आहे , ' एखाद्या देशाने त्यांच्या खेळाडूंमध्ये गुंतवणूक केल्यावरच त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जाऊ शकते. ब्रिटनने प्रत्येक पदकावर 55 लाख पाऊंड इतका खर्च केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. जोवर देशातील व्यवस्था दुरुस्त होत नाही तोपर्यंत पदकाची अपेक्षा करता येणार नाही.’ असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title: Abhinav Bindra's criticism for the cause of India's failure in the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.