अभिनव विद्यालय अव्वल

By admin | Published: July 8, 2015 11:45 PM2015-07-08T23:45:08+5:302015-07-08T23:45:08+5:30

अखिल धारबांदोडा तालुका माध्यमिक विद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा

Abhinav Vidyalaya Top | अभिनव विद्यालय अव्वल

अभिनव विद्यालय अव्वल

Next
िल धारबांदोडा तालुका माध्यमिक विद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा
कुळे : क्रीडा व युवा व्यवहार खात्याने आयोजित केलेल्या अखिल धारबांदोडा तालुका माध्यमिक बुद्धिबळ स्पर्धेत मोले येथील अभिनव विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यांनी चारही गटांत अव्वल स्थान पटकाविले. ही स्पर्धा धारबांदोडा येथे झाली. ही स्पर्धा १७ वर्षांखालील मुले व मुली व १४ वर्षांखालील मुले व मुली अशा गटांत झाली. विजेते पुढीलप्रमाणे- १७ वर्षांखालील मुलगे- समीरबेग कटकोल, नवीन नाईक, नीलेश सुझरे, अझीमबेग कटकोल व विठ्ठल थोरात. १७ वर्षांखालील मुली- नमीशा झोरे, सुश्मीता झोरे, नमिता नाईक, अंकिता शिंदे व गीता पावणे. १४ वर्षांखालील मुलगे- मनोज गावकर, साहील बेग कटकोल, कोंडी शेळखे, शब्बीरबेग कटकोल व अलोक राठोड. १४ वर्षांखालील मुली- साईशा प्रभू, रुक्षा गावकर, प्रतीक्षा शिंदे, दिक्षिता खरात व अस्मतबी कटकोल. या स्पर्धकांना मार्गदर्शन पी. के. पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
ढँङ्म३ङ्म : 0807-ढडठ-06
कॅप्शन: बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक. छाया- पी. के. पाटील.

Web Title: Abhinav Vidyalaya Top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.