अभिषेक बच्चन नोकरीच्या शोधात, भरला सरकारी नोकरीचा फॉर्म!

By admin | Published: May 2, 2017 07:47 PM2017-05-02T19:47:02+5:302017-05-02T19:49:53+5:30

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या नोकरीच्या शोधात आहे, त्यासाठी तो कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) परीक्षेची तयारी करत आहे.

Abhishek Bachchan in search of job, government job form filled! | अभिषेक बच्चन नोकरीच्या शोधात, भरला सरकारी नोकरीचा फॉर्म!

अभिषेक बच्चन नोकरीच्या शोधात, भरला सरकारी नोकरीचा फॉर्म!

Next
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 2 - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या नोकरीच्या शोधात आहे, त्यासाठी तो कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी) परीक्षेची तयारी करत आहे. आश्चर्य वाटलं असेल, पण हे आम्ही म्हणत नसून कर्मचारी निवड आयोगासाठी घेण्यात येत असलेल्या परीक्षांसाठी अभिषेकच्या नावाने अर्ज करण्यात आला आहे.  
 
कर्मचारी निवड आयोगाच्या  मल्टि टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ परिक्षेच्या पहिल्या टप्प्यासाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली . राजस्थानच्या जयपूर येथे अभिषेकचं परीक्षा केंद्र होतं पण अभिषेक या परीक्षेसाठी पोहोचला नाही. 
 
या प्रकरणात कर्मचारी निवड आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.  एसएससीच्या वेबसाइटवर अभिषेक बच्चनच्या नावे प्रवेश पत्र जारी करण्यात आलं आहे. प्रवेश पत्रावर अभिषेक बच्चनचा फोटोदेखील आहे. खरंतर कोणीतरी खोडकर वृत्तीच्या व्यक्तीने अभिषेकच्या नावाने अर्ज केला होता पण कर्मचारी निवड आयोगाने कोणतीही शहानिशा न करता अभिषेकचा फोटो असतानाही प्रवेश पत्र जारी केलं. इतकंच नाही तर यासाठी अभिषेकला 2405283611 हा रोल नंबर देण्यात आला. अर्जामध्ये 69 ट्रिपल एक्स कॉलनी जयपूर, लातूर महाराष्ट्र असा त्याचा पत्ता देण्यात आला असून अर्जदार महिला असल्याच्या चौकटीवर टीक
करण्यात आलं आहे.
 

Web Title: Abhishek Bachchan in search of job, government job form filled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.