अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींसोबतच्या मतभेदांचे वृत्त फेटाळले, म्हणाले त्या माझ्या नेत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 08:05 AM2022-02-16T08:05:07+5:302022-02-16T08:06:27+5:30
West Bengal Politics: डायमंड हार्बर येथून तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री Mamata Banerjee यांचे भाचे Abhishek Banerjee यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
कोलकाता - डायमंड हार्बर येथून तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आता अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत कुठलेही मतभेद नसल्याचे अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.ममता बॅनर्जी यांनी एका आपातकालीन बैठकीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांसह राष्ट्रीय पदे बरखास्त केली होती. राष्ट्रीय सरचिटणीस पद हे अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे होते. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी २० सदस्यीय समिती स्थापन केली होती.
दरम्यान, ममता बॅनर्जींसोबतच्या मतभेदांबाबत प्रतिक्रिया देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, ममता बॅनर्जी या माझ्या नेत्या आहेत. त्यांनी आघाडीवर राहून अनेक लढाया लढल्या आहेत. त्यांना पाहून मी केवळ शक्ती आणि प्रेरणाच मिळवलेली नाही तर आम्हा लोकांना लढण्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण काही नाही आहे. आमच्या माननीय अध्यक्षा आमच्यासाठी माननीय प्रकाश आहे. ममता बॅनर्जी ह्या त्याच व्यक्ती आहेत. ज्यांनी आम्हाला सर्व फुटिरतावादी शक्तींविरोधात लढणे शिकवले आहे.
अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले की, मी ममता बॅनर्जी यांच्या संघातील सैनिकांपैकी एक आहे. तसेच मी त्यांच्या आदेशानुसार काम करणार आहे. दरम्यान, पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात काहीही मतभेद नाही आहेत. पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे काही वैचारिक मतभेद आहेत.