लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणा-यांनाही गर्भपाताचा हक्क- उच्च न्यायालय
By admin | Published: September 22, 2016 11:55 AM2016-09-22T11:55:51+5:302016-09-22T12:26:48+5:30
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपेही आता गर्भपात करू शकतात. आतापर्यंत हा अधिकार केवळ लग्न झालेल्यांनाच होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22- लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपेही आता गर्भपात करू शकतात. आतापर्यंत हा अधिकार केवळ लग्न झालेल्यांनाच होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत महत्वाचा निर्णय देताना वैद्यकिय गर्भपातासंबंधी कायद्यानुसार लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लग्नासारख्या नात्यात राहणा-या महिलांनाही गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं.
45 वर्ष जुन्या असलेल्या या कायद्यानुसार एखाद्या विवाहीत महिलेला जर गर्भधारणा झाली असेल आणि तिला गर्भपात करायचा असेल तर गर्भधारणेच्या 20 आठवड्यांमध्ये तिला गर्भपात करण्याचा हक्क आहे. मात्र, त्यासाठी महिलेला गर्भधारणा ही इच्छेविरूद्ध झाल्याचं किंवा बाळाच्या जन्माने महिलेला मानसिक किंवा अन्य त्रास होण्याची शक्यता असल्याचं सिद्ध करणं गरजेचं आहे.
मात्र, या कायद्यात केवळ विवाहीत महिलांचा उल्लेख आहे. त्यामुळे आजच्या युगात लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लग्नासारख्या नात्यात राहणा-या महिलांनाही गर्भपात करण्याचा अधिकार पाहिजे असं उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितलं.
तुरूंगात कैद असलेल्या एका महिलेच्या याचिकेवर ही सुनावणी झाली. न्यायमुर्ती ताहिलरमानी आणि मृदूला भाटकर यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.