Indian Air Strike on Pakistan: 'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज; कारगिलनंतर पुन्हा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 11:36 AM2019-02-26T11:36:35+5:302019-02-26T12:01:57+5:30

भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

about IAF's fighter jet Mirage 2000 | Indian Air Strike on Pakistan: 'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज; कारगिलनंतर पुन्हा कमाल!

Indian Air Strike on Pakistan: 'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज; कारगिलनंतर पुन्हा कमाल!

Next
ठळक मुद्दे ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले.Dassault Aviation या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमानांचा मोठ्याप्रणात वापर करण्यात आला होता. 

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबाद भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे ‘मिराज'?

- भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाईन तयार करण्यात आले होते. Dassault Aviation या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. 

- हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करुन त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले.

- ‘मिराज 2000’ लढाऊ विमान औपचारिकपणे 29 जून 1985 मध्ये भारतीय वायुसेनाच्या 7 क्रमांकाच्या स्क्वाड्रॉनमध्ये समाविष्ट करण्यात आले. कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमानांचा मोठ्याप्रणात वापर करण्यात आला होता. 

- ‘मिराज 2000’ विमानाची लाबी 47 फूट आहे. वजन जवळपास 7500 किलो इतके आहे. 2336 किमी प्रतितास स्पीड आहे. तर 125 राउंड गोळ्या प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे.

- तसेच, 68 मिमीची 18 रॉकेट प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे. जमिनीच्या जवळ जाऊन देखील हल्ला आणि अचूक लक्ष अचूक साधण्याची क्षमता या विमानामध्ये आहे. 



 

Web Title: about IAF's fighter jet Mirage 2000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.