सागरी मार्गाने दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, नौदलप्रमुख सुनील लान्बा यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 06:22 AM2019-03-06T06:22:14+5:302019-03-06T06:22:32+5:30
पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देत नौदलप्रमुख सुनील लान्बा यांनी अतिरेक्यांना सागरी मार्गे भारतात घुसण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आपल्याकडे आहे, असे सोमवारी सांगितले.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देत नौदलप्रमुख सुनील लान्बा यांनी अतिरेक्यांना सागरी मार्गे भारतात घुसण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आपल्याकडे आहे, असे सोमवारी सांगितले.
लान्बा यांनी पाकिस्तानचे थेट नाव घेण्याचे टाळले. पण ते म्हणाले की, भारताला अस्थिर बनवण्याचा डाव एक देश सतत आखत असतो. त्या देशातून मिळालेल्या मदतीमुळेच दहशतवादी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करू शकले, हे उघड आहे. आता दहशतवाद्यांना सागरी मार्गे भारतात घुसण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती नौदलाला मिळाली आहे. मात्र आम्हीही तितकेच दक्ष असून, अशा कारवाया हाणून पाडल्या जातील.
लान्बा म्हणाले की, जगातील मोजके देशच या दहशतवादापासून स्वत:चा बचाव करू शकले
आहेत.
>मुंबई हल्ल्यासारखेच
मुंबईवर २६ नोव्हेंबर २00८ रोजी जो हल्ला झाला, त्यातील दहशतवादीही पाकिस्तानी होते. ते सागरी मार्गेच मुंबईत आले होते, हे विशेष. नौदलप्रमुखांच्या आजच्या वक्तव्यामुळे तसेच हल्ले करण्याची तयारी पाकिस्तानात सुरू असल्याचे उघड झाले आहे.