तामिळनाडूतील शिक्षणसंस्थेतून तब्बल ३० कोटी रुपये केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 04:45 AM2019-10-15T04:45:39+5:302019-10-15T04:48:34+5:30
प्राप्तिकर खात्याची कारवाई; मोठे करचोरी प्रकरण उघड
नवी दिल्ली : एका व्यावसायिक समूहातर्फे चालविण्यात येणाऱ्या तामिळनडूतील शिक्षण संस्थांवर प्राप्तिकर विभागाने छापे घालून ३0 कोटी रुपये हस्तगत केले आहेत. तामिळनाडूतील चेन्नई नमक्कल, पेरुंदुराई व करूर या शहरांत हे छापे घालण्यात आले होते.
हे बेहिशेबी रक्कम संस्थेतर्फे चालविण्यात येणाºया एका शाळेच्या सभागृहात दडवून ठेवण्यात आली होती. या संस्थेने सुमारे १५0 कोटी रुपयांची रक्कम घोषित केलेली नाही, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे. छापे अद्याप सुरू आहेत. मात्र या संस्थेचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांकडून मिळालेली फीची रक्कम न दाखविता संस्थेने मोठ्या प्रमाणात करचोरी केली, असे प्राप्तिकर खात्याला आढळून आले आहे.
हिशेबाची वही घेतली ताब्यात
विद्यार्थ्यांकडून फी म्हणून मिळणाºया रकमेची वेगळ्या वहीमध्ये नोंद करण्यात येत असे. ती वहीही ताब्यात घेण्यात आली आहे. जमा झालेली ही रक्कम संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या बनावट बँक खात्यात ठेवण्यात येत असे वा ती कर्ज म्हणून घेतल्याचे दाखवण्यात येत असे. या रकमेतून स्थावर मालमत्ता घेण्यात येई आणि कर्मचाºयांनी ती संस्थेला भाड्याने दिली आहे, असे दाखवले जाई, असे अधिकाºयांनी सांगितले. अनेक कर्मचारी व शिक्षक यांना मोठा पगार दिल्याचे दाखवण्याात येत असे तसेच त्यांचा हिशेबही वेगळ्या वहीमध्ये ठेवला जाई, असेही अधिकाºयांना तपासात दिसून आले आहे.