अबब... ३५0 प्रेमप्रकरणे; हैदराबादच्या तरुणाला अखेर तुरुंगाची हवा!

By admin | Published: October 19, 2016 04:50 AM2016-10-19T04:50:20+5:302016-10-19T04:50:20+5:30

लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील कथानकाला साजेसी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

Above ... 350 love affairs; Prisoner air of the Hyderabad youth! | अबब... ३५0 प्रेमप्रकरणे; हैदराबादच्या तरुणाला अखेर तुरुंगाची हवा!

अबब... ३५0 प्रेमप्रकरणे; हैदराबादच्या तरुणाला अखेर तुरुंगाची हवा!

Next


हैदराबाद : ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील कथानकाला साजेसी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. खऱ्याखुऱ्या आयुष्यातील या ‘रिकी बहल’चे नाव आहे वेंकटरत्न रेड्डी. चित्रपटात रणवीर लग्नाचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक करत असे. वेंकटरत्न रेड्डी मात्र तरुणींशी लग्न करून नंतर त्यांची फसवणूक करणारा आहे.
हैदराबादमधील वेंकटरत्नचा प्रवास अखेर तुरुंगात गेल्यानंतरच थांबला. हैदराबाद गुन्हे शाखेने असंख्य महिलांची फसवणूक करणाऱ्या वेंकटरत्नला अखेर अटक केली. विवाह जुळवणाऱ्या लोकप्रिय आॅनलाइन विवाह संस्थांमार्फत तो तरुणी व महिलांशी संप साधत असे. त्याने अशा पद्धतीने ३५0 हून अधिक प्रेमप्रकरणे केली. अखेर अमेरिकेतील एका कुटुंबाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातून अटक केली. तेलंगणातील फसवणुकीच्या नऊ प्रकरणांमध्ये पोलीस वेंकटचा शोध घेत होते. रेड्डीकडे अमेरिका प्रवासाचा बिझनेस व्हिसा होता. (वृत्तसंस्था)
>पदवीपर्यंतही नव्हते शिक्षण...
पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण न केलेल्या वेंकट रत्न रेड्डीचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. त्याचाच फायदा घेऊन तो महिलांना फसवत होता. मात्र इतकी प्रेमप्रकरणे होईपर्यंत त्यांचा माग प्रेमात पडलेल्या तरुणी आणि महिलांना कसा लागला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
>प्रेमशिकारी असा अडकला सावजाच्या जाळ्यात!
अमेरिकेत गेल्यानंतर तो मॅट्रीमोनियल साइटवर स्वत:चे नवीन प्रोफाइल उघडायचा आणि सावज हेरायला सुरुवात करायचा. त्यातून त्याने अनेक तरुणींना भुरळ घातल्याचा अंदाज आहे. ते उघड होण्यासाठी कोणी तक्रार करते का, याची पोलीस वाट पाहत आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध एकच तक्रार आली आहे.
वेंकटरत्नने एका भारतीय वंशाच्या एनआरआय मुलीबरोबर लग्न केले आणि वीस दिवसांमध्ये तिला २० लाख रुपयांना फसवले. या कुटुंबाने रेड्डीच्या विरोधात हैदराबाद पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सद्वारे वेंकटवर पाळत ठेवून, अखेर त्याला अटक केली.
>पोलिसांनी रेड्डीची सोशल नेटवर्किंग साइट्सवरील प्रोफाइल तपासली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्याची ३५० मुलींबरोबर प्रेम प्रकरणे सुरु असल्याची माहिती समोर आली.

Web Title: Above ... 350 love affairs; Prisoner air of the Hyderabad youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.