अबब ! चंद्राबाबूंच्या मुलाच्या संपत्तीत 5 महिन्यांत 316 कोटींची वाढ
By admin | Published: March 9, 2017 03:02 PM2017-03-09T15:02:47+5:302017-03-09T15:04:40+5:30
राजकीय नेत्यांच्या संपत्तीमध्ये दर पाचवर्षांच्या अंतराने शेकडो कोटींनी वाढ होत असते.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 9 - राजकीय नेत्यांच्या संपत्तीमध्ये दर पाचवर्षांच्या अंतराने शेकडो कोटींनी वाढ होत असते. पण आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या मुलाच्या संपत्तीमध्ये अवघ्या पाच महिन्यात तब्बल 316 कोटींची वाढ झाली आहे. ऑक्टोंबर 2016 मध्ये एन.लोकेशची संपत्ती 14.50 कोटी होती.
फेब्रुवारी अखेरपर्यंत याच संपत्तीचे एकूण बाजार मुल्य 330 कोटी रुपये झाले. लोकेशने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून व्यक्तीगत आणि कौटुंबिक संपत्तीची माहिती जाहीर केली. कौटुंबिक मालकीच्या हेरीटेज फूडस लिमिटेडमध्ये शेअर्सच्या माध्यमातून लोकेशने 273,83,94,996 कोटींची संपत्ती दाखवली आहे.
चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाच्या मालकीच्या हेरीटेज फूडसचा काही हिस्सा किशोर बियानींच्या फ्युचर रिटेल लिमिटेडला विकण्यात आला. हेरीटेज फूडसकडे 3.65 टक्के हिस्सा असून नव्याने इश्यू करण्यात आलेल्या शेअर्सनुसार सध्याचे मुल्य 295 कोटी रुपये आहे. लोकेशने अचल संपत्ती 18 कोटी रुपये दाखवली आहे.