अबब! जॉन्सन अँण्ड जॉन्सनला द्यावी लागणार 110 मिलिअन डॉलर्स नुकसानभरपाई
By admin | Published: May 5, 2017 05:49 PM2017-05-05T17:49:03+5:302017-05-05T20:19:38+5:30
महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापूर्वी आपणही घ्या काळजी आणि व्हा चिंतामुक्त.
Next
- मयूर पठाडे
सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रातील जॉन्सन अँण्ड जॉन्सन ही जगप्रसिद्ध कंपनी. या कंपनीची नुसती कोट्यवधी डॉलर्सची उलाढालच नाही, पण जगभरातील र्शीमंतांपासून तर खेड्यापाड्यातल्या गरिबांपर्यंत त्यांची उत्पादनं प्रसिद्ध आहेत. मात्र या कंपनीमागील शुक्लकाष्ट काही संपत नाहीत अशी चिन्हं आहेत. अमेरिकेतील एका न्यायालयानं या कंपनीला तब्बल 110 मिलिअन अमेरिकन डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचा आदेश नुकताच दिला आहे. वैयक्तिक प्रकरणात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा खटला असल्याचं मानलं जात आहे.
जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यानं अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील स्लेम्प नावाच्या एका महिलेला कॅन्सरला सामोरं जावं लागल्यानं ही भरपाई देण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे.
केवळ अमेरिकेतच या कंपनीविरुद्ध हजारो खटले दाखल झाले आहेत. जगभरातील दाव्यांची संख्या एकत्र केली तर ही संख्या आणखीच मोठी होईल.
5- आलं आणि पुदिना
आलं आणि पुदिना एकत्र करुन चांगलं ठेचा. त्यात थोडं पाणी घाला. हा जाडसर लेप रोज चेहर्यावर लावा. काही दिवसांतच चेहरा तर उजळेलच, पण आपल्या त्वचेच्या तक्रारीही दूर होतील आणि चेहर्याला थंडावाही मिळेल.
आजीबाईच्या बटव्यातल्या अशाच करामती आपल्या लहान बाळांसाठीही वापरता येतील. त्यासाठी कोणत्याही रासायनिक सौंदर्यप्रसाधनांची गरज नाही. मात्र ही आजीबाई मात्र खरोखरच आपल्या पारंपरिक ज्ञानात निष्णात असली पाहिजे.