Gujarat Election Survey: गुजरातमध्ये काय प्रभावी ठरणार? या दोन मुद्द्यांसोबत मोदी-शाहांचे कामही बोलणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 01:30 PM2022-11-08T13:30:51+5:302022-11-08T13:31:41+5:30

मतदानापूर्वी राज्यातील वातावरण जाणून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात भाजपला दिलासा मिळत आहे. आम आदमी पक्ष मैदानात उतरल्याने परिस्थिती बदललेली दिसत आहे.

ABP C-Voter Survey: Narendra Modi Amit Shah third favorite in Gujarat; These two issues will be prominent in Election | Gujarat Election Survey: गुजरातमध्ये काय प्रभावी ठरणार? या दोन मुद्द्यांसोबत मोदी-शाहांचे कामही बोलणार...

Gujarat Election Survey: गुजरातमध्ये काय प्रभावी ठरणार? या दोन मुद्द्यांसोबत मोदी-शाहांचे कामही बोलणार...

Next

गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आता प्रचाराला, अपप्रचाराला, आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्वाचा ठरणार याची माहिती समोर आली आहे. यासाठी एक सर्व्हे करण्यात आला आहे.

Gujarat Election: गुजरात निवडणुकीचा मुहूर्त चुकला! पंचांगात पाहून पंडितांनी केले मतदानावर 'भाकीत'

एबीपी-सीव्होटर सर्व्हेमध्ये मतांचे ध्रुवीकरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि मोदी शहा यांचे काम, राज्य सरकारचे काम, आप आदी अनेक प्रश्नांवर मतदारांची मते जाणून घेण्यात आली. यावर लोकांनी आपली मते मांडली आहेत. यात राष्ट्रीय सुरक्षेला जास्त पसंती मिळाली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ध्रुवीकरण आणि तिसऱ्या नंबरवर मोदी शाह यांचे काम राहिले आहे. 

२७ टक्के लोकांना या निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा जास्त प्रभावी राहणार असल्याचे वाटत आहे. १९ टक्के लोकांना ध्रुवीकरण करणारा मुद्दा प्रभावी वाटत आहे. तर मोदी शाह यांच्या कामाला १७ टक्केच लोकांनी प्रभावी म्हटले आहे. राज्य सरकारची कामे आणि आपचा मुद्दा १६-१६ टक्के महत्वाचा वाटत आहे. 

मतदानापूर्वी राज्यातील वातावरण जाणून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात भाजपला दिलासा मिळत आहे. आम आदमी पक्ष मैदानात उतरल्याने परिस्थिती बदललेली दिसत आहे. काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबर रोजी येणार आहे. 
 

Web Title: ABP C-Voter Survey: Narendra Modi Amit Shah third favorite in Gujarat; These two issues will be prominent in Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.