‘त्यांच्या’ जखमेवर मीठ चोळण्याचे काम -मुख्तार अब्बास नक्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 06:02 AM2020-03-01T06:02:36+5:302020-03-01T06:03:04+5:30
दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काही जण प्रयत्न करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक न्याय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काही जण प्रयत्न करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक न्याय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. कुणाचेही नाव न घेता ‘प्रक्षोभक बोलणारे लोक’ आणि काही राजकीय पक्ष असा उल्लेख त्यांनी केला.
चिथावणी देणारे आणि दोषी कारागृहात जातील तसेच शांती कायम राहिल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हिंसाचार दुर्देवी असला तरी काही जण त्यातही धर्मनिरपेक्षतेची यात्रा करीत आहेत. हे बंद झआले पाहिजे, असे ते म्हणाले. पिडितांना न्याय मिळेल, दोषींना शिक्षा आणि शांतता रहावी याला आपले प्राधान्य हवे. जिथे आपण हिंसाचाराच्या घटना पाहिल्या तशा एकता आणि बंधुभावाच्याही पाहत आहोत. ही भारतातील विविधतेतील एकता आहे. हाच भारताचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत भारताच्या आत्म्याला ठेच पोहचायला नको, अशी अपेक्षा नक्वी यांनी व्यक्त केली आहे.