लहान मुलांवर अत्याचार करणा-यांना नपुंसक केले पाहिजे - मद्रास हायकोर्ट
By admin | Published: October 26, 2015 09:37 AM2015-10-26T09:37:55+5:302015-10-26T10:11:43+5:30
निरागस मुलांना आपल्या वासनेची शिकार बनवून त्यांच्यावर अत्याचार करणा-यांना 'नपुंसक' करून शारिरीक संबंध ठेवण्यास असमर्थ बनवले पाहिजे, असे स्पष्ट मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २६ - निरागस मुलांना आपल्या वासनेची शिकार बनवून त्यांच्यावर अत्याचार करणा-यांना 'नपुंसक' करून शारिरीक संबंध ठेवण्यास असमर्थ बनवले पाहिजे, असे स्पष्ट मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. मुलांविरोधातील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी हाच उपाय असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एका परदेशी नागरिकाने लहान मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत हा निर्णय सुनावला.
याप्रकरणी परंपरागत कायद्यांनुसार देण्यात आलेल्या शिक्षांमुळे कोणताही सकारात्मक परिणाम झालेला नाही, मात्र बरेच जण याच्याशी सहमत होणार नाहीत. असे असले तरीही सर्वांनीच समाजातील या क्रूर कृत्यांचे सत्य समजून घेत सुचवण्यात आलेल्या या शिक्षेची प्रशंसा करत सकारात्मक विचार केला पाहिजे, असे मत न्यायालयाने नोंदवले. लहान बालकांवर अत्याचार करणा-यांना नपुंसक करण्याच्या शिक्षेमुळे मोठा बदल होऊन लहान मुलांविरोधातील अत्याचार रोखण्यात नक्की यश मिळेल, याबाबत न्यायालयाला खात्री आहे, असे मत न्यायाधीशांनी नोंदवले.