सैन्यातील जवानांचा महिलेशी अभद्र व्यवहार
By admin | Published: February 11, 2015 12:33 AM2015-02-11T00:33:11+5:302015-02-11T00:33:11+5:30
सैन्यातील जवानांचा महिलेशी अभद्र व्यवहार
Next
स न्यातील जवानांचा महिलेशी अभद्र व्यवहारअंदमान एक्स्प्रेसमधील घटना : लोहमार्ग पोलिसांनी केला गुन्हा दाखलनागपूर : अंदमान एक्स्प्रेसमध्ये ८ फेब्रुवारीला रात्री एका महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या सैन्याच्या जवानांविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.एलीना लाल (४०) रा. चेन्नई या रेल्वेगाडी क्रमांक १६०३१ अंदमान एक्स्प्रेसने ८ फेब्रुवारीला (कोच एस-५, बर्थ क्रमांक ५) चेन्नई ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या कोचमधील सैन्याच्या जवानांनी रात्रीच्या सुमारास या महिलेच्या बर्थवर ताबा मिळविला. संबंधित महिलेने विरोध दर्शवला असता त्यांनी या महिलेशी असभ्य व्यवहार केला. त्यांनी या महिलेचे दागिने हिसकावले आणि कोचचा दरवाजा लावून तिला बंद केले. गाडीत एकाही आरपीएफ जवानाची ड्युटी नसल्यामुळे या महिलेला तक्रार करता आली नाही. पहाटे ३.४५ वाजता ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. यावेळी या महिलेने रेल्वेस्थानकावर उपस्थित टीसीला घडलेली हकीकत सांगितली. परंतु सैन्यातील जवानांनी ही महिला वेडी असून ती विनातिकीट प्रवास करीत असल्याचे सांगून टीसीची दिशाभूल केली. नागपुरात आल्यावर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या महिलेने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)..............