'त्या' डॉक्युमेंट्रीविरोधात ABVPने दाखवला 'काश्मीर फाइल्स' चित्रपट, हैदराबाद यूनिव्हर्सिटीत राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 09:22 AM2023-01-27T09:22:25+5:302023-01-27T09:22:54+5:30
गुजरात दंगलीवरील डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरुन हैदराबाद यूनिव्हर्सिटीत SFI आणि ABVP चे कार्यकर्ते भिडले.
हैदराबाद : बीबीसीच्या डॉक्युमेट्रीवरुन (BBC Documentry) उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या अनेक विद्यापीठांमध्ये मोठा राडा होत आहे. जेएनयू आणि जामियानंतर आता हैदराबाद विद्यापीठात गुरुवारी ही डॉक्युमेंट्री दाखवण्यावरुन बराच गदारोळ झाला. येथे SFI आणि ABVP चे कार्यकर्तेय एकमेकांना भिडले. एसएफआयने बीबीसी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग आयोजित केले होते, तर एबीव्हीपीने 'द काश्मीर फाइल्स' फिल्म दाखवली. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे.
बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत हैदराबाद विद्यापीठात एसएफआय आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या डॉक्युमेंट्रीचे स्क्रिनिंग एसएफआयने आयोजित केले होते. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी काश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला. यापूर्वी 21 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने प्रशासनाच्या परवानगीशिवाय हैदराबाद विद्यापीठात बीबीसी डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग आयोजित केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी अहवाल मागवला होता. विद्यापीठ प्रशासनाने दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना कोणताही चित्रपट न दाखवण्याचा सल्ला दिला होता.
Glimpses from the succesful screening of the documentary 'India: The Modi Question' organized by SFI HCU on the Republic Day following the call of SFI CEC. More than 400 students turned out for the screening rejecting the false propaganda and the attempts of ABVP to (1/2) pic.twitter.com/Jy3On3Kps5
— SFI HCU Unit (@SfiHcu) January 26, 2023
SFI चा दावा - 400 विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्री पाहिली
केंद्राने बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीला अपप्रचार म्हणत त्यावर बंदी घातली होती. असे असूनही, एसएफआयने गुरुवारी डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग आयोजित केले. SFI च्या म्हणण्यानुसार, हैदराबाद विद्यापीठात झालेल्या स्क्रीनिंगमध्ये 400 विद्यार्थी उपस्थित होते. एसएफआयने ट्विट केले की, या विद्यार्थ्यांनी ABVP आणि प्रशासनाच्या अशांतता निर्माण करण्याचा आणि स्क्रीनिंग थांबवण्याचा खोटा प्रचार आणि प्रयत्न हाणून पाडले. दुसरीकडे, अभाविपने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे स्क्रिनिंग केले. हा चित्रपट काश्मीरमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित आहे.
Join us for the movie screening of "The Kashmir Files" on 26th January 2023 at 6pm at Ambedkar Chowk (North ShopCom).#RightToJustice#TheKashmirFiles#ABVP#ABVPHCU#RepublicDaypic.twitter.com/4fcx8vybsI
— ABVP HCU (@abvpuoh) January 25, 2023
अभाविपचा आरोप
तत्पूर्वी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य गेटवर निदर्शने केली. प्रशासनाने त्यांना स्क्रीनिंगचे साहित्य घेऊन आत येऊ दिले नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. प्रशासनाने बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगला परवानगी दिली, तर आम्हाला तसे करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या एका गटाने वसतिगृहात स्क्रीनिंग ठेवल्याचे आम्हाला समजले. मात्र, आता कॅम्पसमधील परिस्थिती शांततापूर्ण आहे.