दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 04:46 PM2019-09-13T16:46:06+5:302019-09-13T16:46:54+5:30
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाशी निगडीत असलेल्या अभाविपने दणदणीत विजय मिळवला.
नवी दिल्ली - दिल्लीविद्यापीठविद्यार्थी संघटनेच्या (DUSU) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाशी निगडीत असलेल्या अभाविपने दणदणीत विजय मिळवला. अभाविपने अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदाच्या जागा जिंकल्या. तर दुसरीकडे काँग्रेसशी संलग्न असलेल्या एनएसयूआयला केवळ सचिवपदावर विजय मिळवता आला. या विजयासोबतच अभाविपने दिल्ली विद्यापीठविद्यार्थी संघटनेमधील आपले वर्चस्व कायम राखले आहे.
या निवडणुकीत अभाविपने अग्रसेन महाविद्यालयातील अक्षित दहिया नांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. तर एनएसयूआयने महिला उमेदवाराला मैदानात उतरवत चेतना त्यागी यांना संधी दिली होती. तर आइसा या डाव्या संघटनेने दामिनी काइन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरववे होते. तसेच एआयडीएसओकडून रोशनी यांनी निवडणूक लढवली होती.
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad(ABVP) wins three(President,Vice President and Joint Secretary) out of the four posts in Delhi University Student Polls, National Students' Union of India(NSUI) wins one(Secretary). pic.twitter.com/4HV73BjKER
— ANI (@ANI) September 13, 2019
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले होते. दिल्ली विद्यापीठामधील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत नेहमीच अभाविप आणि एनएसयूआय यांच्यातच मुख्य लढत होत असते.