‘एसीबी’ने घेतली महिला आयोगाच्या कार्यालयाची झडती

By admin | Published: August 19, 2016 01:03 AM2016-08-19T01:03:24+5:302016-08-19T01:03:24+5:30

दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिल्ली महिला आयोगाच्या (डीसीडब्ल्यू) कार्यालयाची गुरुवारी झडती घेतली. माजी मुख्य सचिव आणि आयोगाच्या माजी अध्यक्षांनी

ACB has taken the findings of the Women's Commission office | ‘एसीबी’ने घेतली महिला आयोगाच्या कार्यालयाची झडती

‘एसीबी’ने घेतली महिला आयोगाच्या कार्यालयाची झडती

Next

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिल्ली महिला आयोगाच्या (डीसीडब्ल्यू) कार्यालयाची गुरुवारी झडती घेतली. माजी मुख्य सचिव आणि आयोगाच्या माजी अध्यक्षांनी डीसीडब्ल्यूविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त झालेल्या तक्रारींशी संबंधित कागदपत्रे घेण्यासाठी कार्यालयात येणार असल्याचे आपण डीसीडब्ल्यूला कळविले होते, असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

काय होती तक्रार
डीसीडब्ल्यूतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत जवळच्या लोकांना झुकते माप देऊन मालीवाल यांनी पक्षपात केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. मालीवाल यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. दुसरी तक्रार दिल्लीचे माजी मुख्य सचिव ओमेश सहगल यांची असून, मालीवाल एका क्लबला कारणे दाखवा नोटीस बजावून अधिकारांचा दुरुपयोग करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. सहगल या क्लबचे सदस्य आहेत. क्लबच्या जलतरण तलावात सहगल त्रास देत असल्यामुळे आपण त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर आपण आणि पतीला क्लबमधून निलंबित करण्यात आले, असा दावा एका महिलेने केला होता.

Web Title: ACB has taken the findings of the Women's Commission office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.