तहसीलदाराच्या घरावर एसीबीचा छापा, घबाड पाहून अधिकारीही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 09:17 AM2020-08-17T09:17:21+5:302020-08-17T09:18:06+5:30
शुक्रवारी रात्री एसीबीच्या पथकाने तहसीलदार बलाराजू नागराजू यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी, लाच घेताना रंगेहात त्यांना पकडण्यात आले.
हैदराबाद - शहरातील एका तहसीलदाराच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा टाकून कारवाई केली. त्यामध्ये, सबंधित अधिकाऱ्याला 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. बलराजू असं आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून पोलिसांनी लाच घेण्याच्या आरोपाखाली त्यास अटक केली आहे. या तहसीलदाराच्या घरात सापडलेलं पैशाचं घबाड पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे फिरले.
जमिन खरेदी-विक्री व्यवहारात सहकार्य करण्यासाठी तहसिलदाराने ही 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी रात्री एसीबीच्या पथकाने तहसीलदार बलाराजू नागराजू यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी, लाच घेताना रंगेहात त्यांना पकडण्यात आले. तहसीलदारासोबतच एका ग्रामसेवकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. बी. साईराज असे या ग्रामसेवकाचे नाव असून 28 एकर जमिनीच्या व्यवहाराता ही लाच घेण्यात येत होती, अशी माहिती पुढे आली आहे.
हैदराबादपासून विलगीकरण केलेल्या मलकानगिरी या जिल्ह्यात एसीबीने ही कारवाई केली आहे. एसीबीच्या पथकाने लाचेची रक्कम मोजल्यानंतर तेही आश्चर्यचकित झाले आहेत. एसीबीकडून हैदराबादचे प्रमुख महसूल व निवासी परसरातील तहसीलदाच्या घरावर हा छापा टाकण्यात आला. शुक्रवारी रात्री छापा टाकण्यात आल्यानंतर शनिवारीही तपास सुरुच होता.