पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 06:51 PM2020-10-27T18:51:05+5:302020-10-27T18:52:17+5:30
एरंडगाव : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील शेती कामांना वेग येवू लागला आहे. परिसरात मकाचे पिक मोठ्या प्रमाणात आहे. सतत पाऊस सुरु असल्याने वावरात पाणी साचले होते. वाहतुकीसाठी रस्ते नव्हते त्यामुळे मका व सोयाबीनच्या सोंगण्या लांबणीवर पडल्या होत्या. ज्यांच्या सोंगण्या झाल्या त्यांची पिके वावरातच पडून होती. पावसाने उघडीप दिल्याने सोंगण्या सुरु होत असल्या तरी मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षापर्यंत चार्याच्या बदल्यात सोंगण्या केल्या जात होत्या, परंतु या वर्षी मकाचे क्षेत्र विक्रमी असल्याने चार्याची मागणी घटली आहे.
एरंडगाव : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील शेती कामांना वेग येवू लागला आहे.
परिसरात मकाचे पिक मोठ्या प्रमाणात आहे. सतत पाऊस सुरु असल्याने वावरात पाणी साचले होते. वाहतुकीसाठी रस्ते नव्हते त्यामुळे मका व सोयाबीनच्या सोंगण्या लांबणीवर पडल्या होत्या. ज्यांच्या सोंगण्या झाल्या त्यांची पिके वावरातच पडून होती. पावसाने उघडीप दिल्याने सोंगण्या सुरु होत असल्या तरी मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षापर्यंत चार्याच्या बदल्यात सोंगण्या केल्या जात होत्या, परंतु या वर्षी मकाचे क्षेत्र विक्रमी असल्याने चार्याची मागणी घटली आहे.
मका सोंगणीचा भाव एकरी साडेचार ते पाचहजार आहे. सोंगण्यांबरोबर शेतकरी कांद्याचीही तयारी करीत आहे. अनेक वेळा कांद्याचे रोप टाकुनही हाती काहीच न लागल्याने रोप टाकण्यासाठी शेतकरीशेतीची मशागत करीत आहे. अतीवृष्टीमुळे रब्बी हंगामास ऊशीर होत असला तरी मुबलक पाणी असल्यामुळे उन्हाळ कांदा, उन्हाळ मका, गहु, हरबरा आदी पिके घेण्यासाठी शेतकरी जोमाने कामाला लागले आहे. जसजशी वापसा होत आहे तसतसा शेती कामांना वेग येतो आहे. पावसाने अशीच उघडीप दिली तर खरीपाची पिकेही हाताशी लागतील आणि रब्बी हंगामही यशस्वी होईल असा विश्वास शेतकरीवर्गात व्यक्त केला जात आहे.