Accident: दिवाळीला बसमध्ये पेटवला दिवा, लागली आग, ड्रायव्हर-कंडक्टरचा जळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:14 IST2022-10-25T17:13:20+5:302022-10-25T17:14:04+5:30
Accident In Diwali : दिवाळीच्या रात्री खादगडा बस स्टँडवर एक मोठी दुर्घटना घडली. येथील मूनलाइट नावाच्या बसमध्ये आग लागली. आग लागल्याने बसमध्ये झोपलेल्या दोन व्यक्तींचा जळून मृत्यू झाला

Accident: दिवाळीला बसमध्ये पेटवला दिवा, लागली आग, ड्रायव्हर-कंडक्टरचा जळून मृत्यू
रांची - दिवाळीच्या रात्री खादगडा बस स्टँडवर एक मोठी दुर्घटना घडली. येथील मूनलाइट नावाच्या बसमध्ये आग लागली. आग लागल्याने बसमध्ये झोपलेल्या दोन व्यक्तींचा जळून मृत्यू झाला. दोन्ही मृतांची ओळख मदन महतो आणि इब्राहीम अशी झाली आहे. हे दोघेही बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर होते, अशी माहिती समोर येत आहे.
याबाबच मिळत असलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री उशिरा घडली. सध्या खादगडा टीओपी या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही बस रांची येथून सिमडेगा या मार्गावर फेऱ्या मारायची. पोलिसांच्या म्हणण्यानुसार दिवाळीच्या रात्री दिवा पेटवून बसमध्ये ठेवल्याने ही आग लागली.
स्टँडमध्ये उभ्या असलेल्या या बसमध्ये दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर ड्रायव्हर मदन आणि कंडक्टर इब्राहीम हे दिवा पेटवून बसमध्येच झोपले होते. तेवढ्यात दिव्यामुळे बसमध्ये आग लागली. आगीच्या ज्वाळा एवढ्या मोठ्या होत्या की, त्यांनी संपूर्ण बसला आपल्या विळख्यात घेतले. या आगीत ड्रायव्हर आणि कंडक्टरचा होरपळून मृत्यू झाला. बस जळत असल्याची माहिती काही लोकांनी पोलिसांना दिली. तत्पूर्वी लोकांनी आग शमवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.