Accident: पिकअपसमोर अचानक आला प्राणी, भीषण दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू 12 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 02:24 PM2022-03-20T14:24:54+5:302022-03-20T14:25:33+5:30

राजथल येथील रहिवाशी 57 वर्षीय वीरमति, 62 वर्षीय कृष्णा आणि 47 वर्षीय रानी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. 

Accident: An animal suddenly appeared in front of the pickup, killing 3 women in a horrific accident | Accident: पिकअपसमोर अचानक आला प्राणी, भीषण दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू 12 जखमी

Accident: पिकअपसमोर अचानक आला प्राणी, भीषण दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू 12 जखमी

googlenewsNext

चंडीगड - हरयाणाच्या हिसार शहरात अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी आहेत. हांसी जिंद रोडवर वेगात येणाऱ्या पिकअपच्या समोर एक प्राणी अचानक आडवा आल्याने चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यावेळी, गाडी एका झाडावर आदळली. या गाडीत एकूण 15 जण प्रवास करत होते. राजथल येथील रहिवाशी 57 वर्षीय वीरमति, 62 वर्षीय कृष्णा आणि 47 वर्षीय रानी यांचा अपघातातमृत्यू झाला आहे. 

स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलीस आणि रुग्णवाहिकेला दिली. स्थानिकांच्या मदतीने आणि प्रशासनाच्या सहकार्याने तात्काळ सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तीन महिलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नारनौंद येथील सरकारी रुग्णायात प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना हिसार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नारनौंद येथील राजथल गावातून एक कुटुंब राजस्थान येथून पूजा अर्चना करुन परत येत होते. जसे ते नारनौंदजवळ पोहोचले तेव्हा एक उधळलेला प्राणी अचानक गाडीसमोर आला. त्यामुळे, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. गाडी झाडावर आदळल्याने गाडीतील तीन महिलांचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी डॉक्टर बिटू यांनी सांगितले की, रुग्णालयात अपघातात झालेल्या घटनेतील जखमी आल्याचे समजले. त्यामध्ये, 15 जणांना जखम झाली होती. मात्र, जखमीतील तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासात निदर्शनास आले. त्यानंतर, 12 जणांवर तातडीने प्राथमिक उपचार करुन त्यांना हिसार येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले.   
 

Web Title: Accident: An animal suddenly appeared in front of the pickup, killing 3 women in a horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.