कोलकाता विमानतळावर मोठी दुर्घटना! Indigo आणि Air India'च्या विमानांचे पंखे एकमेकांवर आदळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:55 PM2024-03-27T16:55:33+5:302024-03-27T17:10:27+5:30
या अपघातानंतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, आमचे एक विमान कोलकाता विमानतळाच्या धावपट्टीवर चेन्नई, तामिळनाडूला जाण्यासाठी क्लिअरन्सची वाट पाहत होते.
पश्चिम बंगालमधील कोलकाता विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांच्या पंखांची टक्कर झाल्याचे समोर आले आहे. इंडिगोचे विमान टॅक्सीवेवरून जात असताना विमानाचा काही भाग एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाला धडकला. या अपघातात कोणतेही नुकसान झालेले नाही.
या अपघातानंतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, आमचे एक विमान कोलकाता विमानतळाच्या धावपट्टीवर चेन्नई, तामिळनाडूला जाण्यासाठी क्लिअरन्सची वाट पाहत होते. यावेळी, दुसऱ्या विमान कंपनीच्या विमानाच्या पंखांची टोक त्याच्यावर आदळले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आम्ही नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमानतळ प्राधिकरणाला सहकार्य करत आहोत. या अपघातामुळे प्रवाशांची गैरसोय झाली याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असंही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली
या अपघातानंतर डीजीसीएने इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकांवर कारवाई केली आहे. विमान वाहतूक कंपनीच्या या वैमानिकांना या एका दिवसाचा पगार मिळणार नाही. एअरलाइन्स उद्योगात 'रोस्टर्ड ऑफ' अंतर्गत कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस मोजले जात नाहीत आणि त्या दिवशी त्यांना पगारही मिळत नाही. याअंतर्गत डीजीसीएने इंडीओच्या पायलटवर कारवाई केली आहे.
Ground Collision at Kolkata Airport
— AviationAll (@AviationAll_) March 27, 2024
🔵 VT-TGG, 737-800 of Air India Express and VT-ISS, A320neo of IndiGo have made contact while taxing to RW19R
🔵 VT-TGG was off to Chennai and VT-ISS was off to Darbhanga, both returned to bay
🔵 Further details awaited
📸@lmfaookbropic.twitter.com/I6ZHKLMli6