VIDEO: बंगळुरुच्या जत्रेत कोसळला १५० फूट उंचीचा रथ; गावकऱ्यांनी खर्च केले होते कोट्यवधि
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 12:56 IST2025-03-23T12:51:46+5:302025-03-23T12:56:23+5:30
बंगळुरुत एका जत्रेदरम्यान भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

VIDEO: बंगळुरुच्या जत्रेत कोसळला १५० फूट उंचीचा रथ; गावकऱ्यांनी खर्च केले होते कोट्यवधि
Bengaluru Accident: कर्नाटकच्या बंगळुरुमधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. आणेकल तालुक्यातील हुस्कुर मद्दुरम्मा जत्रेतील दोन रथांचा शनिवारी सायंकाळी अचानक अपघात झाला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे रथ लाकडाचे होते आणि त्यांची उंची १५० फुटांपेक्षा जास्त होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रथ कोसळताना दिसत आहे.
बेंगळुरूच्या आणेकलजवळील होसूरमध्ये मद्दुरम्मा देवीच्या जत्रेदरम्यान देवीची मूर्ती घेऊन जाणारा रथ पडला. भाविक हा रथ ओढत असताना हा १५० फूट उंच रथ एका ठिकाणी कोसळला. बाकीचे कथ दोड्डनागमंगला आणि रायसंद्रा गावातून बैल, जेसीबी, पुलर आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने रथ ओढले जात होते. त्यातील एक रथ हुस्कुर मद्दुरम्मा येथे पोहोचला तेव्हा हा भीषण अपघात घडला. मृतांमध्ये रोहित आणि ज्योती यांचा समावेश आहे. दुसरा अपघात दोड्डानगरमंगळा गावात घडला. जत्रेत आणलेला रथ चिक्कनगरमंगळाजवळ पडला. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात रथ ओडताना दिसत आहेत. रथ एका बाजूला कलंडल्यानंतर हळू हळू जमिनीवर पडला. तेव्हा लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. जत्रेत एका मंदिरासमोर हे चार उंच रथ येणार होते. मात्र अचानक हवामान बदलले आणि जोरदार वादळ आले. या वादळात दोन रथांचा तोल गेला. रथाखाली चिरडले जाऊ नये म्हणून लोक पळू लागले मात्र दोघांचा मृत्यू झाला.
😢 ಹುಸ್ಕೂರು ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ, ದೊಡ್ಡ ನಾಗಮಂಗಲದ ಮತ್ತು ರಾಯಸಂದ್ರ ದ ಎರಡು ತೇರುಗಳು ಮಳೆ ಬಿರುಗಾಳಿಯ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿ ಧರೆಗೆ ಉರುಳಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾವೆ 🙏🏻 #BengaluruRainspic.twitter.com/ZLV8XM4P5u
— ನಿಶಾ ಗೌರಿ💛❤ (@Nisha_gowru) March 22, 2025
दरम्यान, या जत्रेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे कोणत्या गावाचा रथ किती उंच असतो यासाठी स्पर्धा असते. यावेळी गट्टाहल्लीच्या ग्रामस्थांनी कोट्यवधी रुपये खर्चून नवीन रथ बांधला होता. चार ते पाच दिवस भरणारी ही भव्य जत्रा असल्याने आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ येथे जमतात.