Accident: प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टारचा भीषण अपघातात मृत्यू, कारमधील इतर दोघेही जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:45 AM2022-11-22T10:45:37+5:302022-11-22T10:46:17+5:30

Accident: सोमवारी रात्री एक भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात इंस्टाग्राम स्टार राऊडी भाटी उर्फ रोहित भाटी याचा मृत्यू झाला. तर या अपघातात त्याचे दोन मित्रही गंभीर जखमी झाले आहेत.

Accident: Famous Instagram star rowdy bhati dies in horrific accident, two others in car injured | Accident: प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टारचा भीषण अपघातात मृत्यू, कारमधील इतर दोघेही जखमी 

Accident: प्रसिद्ध इंस्टाग्राम स्टारचा भीषण अपघातात मृत्यू, कारमधील इतर दोघेही जखमी 

googlenewsNext

नवी दिल्ली - ग्रेटर नोएडामध्ये सोमवारी रात्री एक भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात इंस्टाग्राम स्टार राऊडी भाटी उर्फ रोहित भाटी याचा मृत्यू झाला. तर या अपघातात त्याचे दोन मित्रही गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

रात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इन्स्टाग्राम स्टार राऊडी भाटी त्याच्या दोन मित्रांसह स्विफ्ट गाडीमधून जात होता. प्रवासादरम्यान त्यांची गाडी चुहडपूर अंडरपासजवळ नियंत्रण सुटून एका झाडावर जाऊन आदळली.  

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना राऊडी भाटीचा मृत्यू झाला. गाडीमध्ये राऊडीचे दोन मित्र मनोज आणि आतिष हेसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

ग्रेटर नोएडामधील Beta-2 पोलीस एसएचओ अनिल राजपूत यांनी सांगितले की, तिन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारांदरम्यान राऊडीचा मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

बुलंदशहरात राहणाऱ्या राऊडी भाटीचे इन्स्टाग्रावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स होते. तसेच तो त्याच्या संवादांसाठी खूप प्रसिद्ध होता.  

Web Title: Accident: Famous Instagram star rowdy bhati dies in horrific accident, two others in car injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.