रील बनवण्याच्या नादात गेला चार जणांचा जीव, १३० च्या वेगाने सुसाट पळवली कार, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 05:10 PM2024-01-06T17:10:15+5:302024-01-06T17:10:34+5:30
Accident in Rajasthan: जैसलमेरच्या सांगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देविकोट येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये आई आणि मुलासह चार जणांचा मृत्यू झाला.
जैसलमेरच्या सांगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देविकोट येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये आई आणि मुलासह चार जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार कारमधून प्रवास करत असलेले तरुण मद्याचे ग्लास हातात घेऊन गाण्यावर नाचत सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रिल्स बनवत होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या पिक अप ट्रकमधून डाळिंब खरेदी करत असलेले आई आणि मुलगा मृत्युमुखी पडला. तर उपचारादरम्यान कारमधील दोघा तरुणांचाही मृत्यू झाला.
पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी सांगितले की, हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे ८.३० च्या सुमारास घडला. अपघातावेळी कारचा वेळ सुमारे १३० किमी प्रति तास एवढा होता. या दरम्यान, देवीकोटच्या मुख्य रस्त्यावर या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पिकअपला धडक दिली. त्यात तिथे डाळिंब करत असलेल्या आई आणि मुलग्याचा मृत्यू झाला. पिकअपला धडकल्यानंतर कार सुमाारे २० फूट घसरत जाऊन थांबली.
कारच्या धडकेत मृत्युमुखी पडलेले मायलेक हे नेपाळमधील आहेत. मेनकल आणि मनीष अशी या मायलेकांची नावं आहेत. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करत असलेले तरुणही गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना आणि मृतांना जैसलमेर जवाहिर रुग्णालयामध्ये आणण्यात आले. तिथे कारमधून प्रवास करत असलेल्या रोशन खाँ आणि भवानी सिंह या तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाताची शिकार झालेली मेनकला आणि तिचा पती भीमबहादूर हे तीन वर्षांपूर्वीच देविकोट येथे राहण्यास आली होती. दरम्यान, या अपघातात पिकअपमध्ये बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. कारमधून प्रवास करत असलेले राजू सिंह सिसोदिय आणि लीलू सिंह चौहान यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात होण्यापूर्वी काही वेळ आधी या तरुणांनी मद्यपान केले होते. तसेच त्याचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.