Accident: ऑटोरिक्षावर कंटेनर उलटून भीषण अपघात, रिक्षासह चार जणांचा जागीच चेंदामेंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 11:44 AM2021-12-18T11:44:26+5:302021-12-18T11:44:54+5:30

Accident News: दिल्लीतील आयजीएम स्टेडियमजवळ झालेल्या एका भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी एक कंटेनर ऑटोरिक्षावर उलटून हा अपघात झाला. यात चार जण मृत्युमुखी पडले.

Accident: Four persons were killed on the spot when a container overturned on an autorickshaw | Accident: ऑटोरिक्षावर कंटेनर उलटून भीषण अपघात, रिक्षासह चार जणांचा जागीच चेंदामेंदा

Accident: ऑटोरिक्षावर कंटेनर उलटून भीषण अपघात, रिक्षासह चार जणांचा जागीच चेंदामेंदा

Next

नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील आयजीएम स्टेडियमजवळ झालेल्या एका भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी एक कंटेनर ऑटोरिक्षावर उलटून हा अपघात झाला. यात चार जण मृत्युमुखी पडले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ऑटोरिक्षाच्या चालकाचाही समावेश आहे. तर या अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

हा अपघात दिल्लीतील आयटीओजवळ रिंगरोडवर झाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघात झाल्यानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तर अपघातानंतर घटनास्थळावर लोकांची गर्दी जमली. या घटनेची माहिती त्वरित पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंद करून तपास सुरू केला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी त्यांची ओळख पटवण्यासाठी शोध सुरू केला आहे. दरम्यान, मृतांमध्ये रिक्षाचालकाचाही समावेश आहे.

हा अपघात शनिवारी सकाळी ६.३०च्या सुमासार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी कंटेनरचालकाचा शोध सुरू केला आहे. कंटेरनमधून मिळालेल्या कागदपत्रांमधून ड्रायव्हर आणि कंटेनर मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

Web Title: Accident: Four persons were killed on the spot when a container overturned on an autorickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.