आसाममध्ये मोठी दुर्घटना! ब्रह्मपुत्रा नदीत ३० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 02:10 PM2022-09-29T14:10:39+5:302022-09-29T14:16:35+5:30

आसाममधील धुबरी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. आज (गुरुवारी) ब्रह्मपुत्रा नदीत एक बोट उलटली आहे. या बोटमध्ये ३० जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

accident in Assam Boat carrying 30 people capsizes in Brahmaputra river many missing | आसाममध्ये मोठी दुर्घटना! ब्रह्मपुत्रा नदीत ३० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, अनेक जण बेपत्ता

आसाममध्ये मोठी दुर्घटना! ब्रह्मपुत्रा नदीत ३० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली, अनेक जण बेपत्ता

googlenewsNext

गुवाहाटी : आसाममधील धुबरी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. आज (गुरुवारी) ब्रह्मपुत्रा नदीत एक बोट उलटली आहे. या बोटमध्ये ३० जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकजण यात बुडाल्याची सक्यत वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. 
 
घटनास्थळी पोलीस तसेच बचाव पतक शोधमोहिम राबवत आहेत, या घटनेत ६ ते ७ जण अजुनही गायब असल्याची माहिती, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी दिली.

 

झोपडीत राहणाऱ्या मजुराला कसं मिळालं १ कोटींचं कर्ज, ८ ट्रॅक्टर घेतले; मृत्यूनंतर झाला खुलासा!

धुबरी-फुलबारी या परिसरातील नागरिक एका छोट्या लाकडी बोटवरुन नदी पार करत होती, यावेळी ती बोट नदीपात्रात पाण्यात आदळली.त्यामुळे ती बोट जाग्यावर पलटली. या बोटमध्ये ३० जण प्रवास करत होते. 

यातील अनेकजण धुबरी सर्कल मधील रहिवासी नागरिक होते. यातील काही जणांना पोहता येत होते ते बचावले आहेत. बचावकार्यात सीमा सुरक्षा दलही सहभागी झाले आहेत. 

Web Title: accident in Assam Boat carrying 30 people capsizes in Brahmaputra river many missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Assamआसाम