बोलेरो आणि बसमध्ये टक्कर, भीषण अपघातात महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू, १९ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 10:05 IST2025-02-15T10:04:57+5:302025-02-15T10:05:24+5:30
Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेश प्रदेशमधील मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला असून, बोलेरो आणि बसमध्ये धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहेत.

बोलेरो आणि बसमध्ये टक्कर, भीषण अपघातात महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू, १९ जखमी
उत्तर प्रदेश प्रदेशमधील मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला असून, बोलेरो आणि बसमध्ये धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहेत. बस आणि बोलेरोमधील ही धडक एवढी भीषण होती की त्यात बोलेरोचा चेंदामेंदा झाला.
अपघाताबाबत अधिक माहिती देताना यमुनानगरचे डीसीपी विवेकचंद्र यादव यांनी सांगितले की, महाकुंभमेळ्यासाठी छत्तीसगड येथून भाविकांना घेऊन जात असलेल्या बोलेरोची बसला धडक होऊन प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर मेजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वरूप राणी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. पोलिसांकडून अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.