पुण्याला येणा-या झेलम एक्सप्रेसला अपघात

By admin | Published: October 4, 2016 07:33 AM2016-10-04T07:33:42+5:302016-10-04T07:33:42+5:30

जम्मूहून पुण्याच्या दिशेने येणा-या झेलम एक्सप्रेसला मंगळवारी पहाटे लुधियानाजवळ अपघात झाला.

Accident on Jhelum Express coming to Pune | पुण्याला येणा-या झेलम एक्सप्रेसला अपघात

पुण्याला येणा-या झेलम एक्सप्रेसला अपघात

Next

 ऑनलाइन लोकमत 

लुधियाना, दि ४ - जम्मूहून पुण्याच्या दिशेने येणा-या झेलम एक्सप्रेसला मंगळवारी पहाटे लुधियानाजवळ अपघात झाला. लुधियाना जवळच्या फिलौर येथे झेलम एक्सप्रेसचे नऊ डब्बे रुळावरुन घसरले. मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान हा अपघात झाला. 
 
या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यांना लुधियानाच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मूहून पुण्याच्या दिशेने ही ट्रेन येत असताना अपघात झाला. 
 
ट्रेन सतलज ब्रिजच्या दिशेने जात असताना बी ५स एस १, पीसी, एस २, एस ३, एस ४ एस ५, एस ६, एस ७ आणि एस ८ हे डब्बे रुळावरुन घसरले. अद्यापपर्यंत मोठया प्रमाणावर जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मदतीसाठी तीन बस घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 
 

Web Title: Accident on Jhelum Express coming to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.