Accident Live Video Viral: 'मौत का कुआं'मध्ये भीषण अपघात; आधी 2 दुचाकी कोसळल्या, त्यावर भरधाव कार आदळली, व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 15:04 IST2022-07-26T15:03:56+5:302022-07-26T15:04:24+5:30
Accident Live Video Viral: 'मौत का कुआं'मध्ये भरधाव धावणाऱ्या दुचाकींचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Accident Live Video Viral: 'मौत का कुआं'मध्ये भीषण अपघात; आधी 2 दुचाकी कोसळल्या, त्यावर भरधाव कार आदळली, व्हिडिओ व्हायरल...
Amroha Accident Viral Video: उत्तर प्रदेशाच्या अमरोहा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जत्रेतील 'मौत का कुआं'मध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा लाइव्ह व्हिडिओ समोर आला असून, यात दोन दुचाकी अचानक खाली कोसळतात आणि त्या दुचाकींवर एक मारुती कार आदळल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
#अमरोहा: मेले में लगे मौत के कुएं में हादसे का लाइव वीडियो सामने आया#AccidentVideo#UttarPradeshpic.twitter.com/hDvYQjGFVH
— alkesh kushwaha (@alkesh_kushwaha) July 26, 2022
ही घटना अमरोहा जिल्ह्यातील उजारी शहरात घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मौत कुआं पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान, स्टंट करणाऱ्या दोन दुचाकी अचानक जमिनीवर कोसळल्या, यानंतर लगेच एक मारुती कारही त्या दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळली. अचानक झालेल्या या अपघातामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
जखमींना रुग्णालयात दाखल केले
या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. अपघातानंतर व्हिडिओमध्ये लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत.