थरारक! फक्त २ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; भरधाव वेगाने आलेली कार पलटली, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:33 IST2025-01-08T19:32:14+5:302025-01-08T19:33:46+5:30

गुजरातमधील एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमध्ये एक का काही सेकंदातच पलटी झाल्याचे दिसत आहे.

accident news just 2 seconds, the unexpected happened; the speeding car overturned | थरारक! फक्त २ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; भरधाव वेगाने आलेली कार पलटली, अन्...

थरारक! फक्त २ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; भरधाव वेगाने आलेली कार पलटली, अन्...

गुजरातमधील वलसाडच्या भिलाड परिसरातील एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक कार काही सेकंदातच पलटी झाल्याचे दिसत आहे. या अपघातामध्ये एका चिमुकलीची मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कारचे नियंत्रण सुटून ा अपघात झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अपघाताच्या वेळी कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही समोर आले आहे. 

सिंह आहे तो सिंह! जंगलाच्या राजाला म्हशीसारखे हाकलले; वनरक्षकाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर समोर आले आहे. व्हिडीओमध्ये वेगात येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला ही कार पलटी झाली. या वाहनाने जवळच्या घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे चार जण जखमी झाले आहेत. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला बोलावले, त्यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. भिलाड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. चालक मद्यधुंद होता, त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, हे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून रस्ता सुरक्षा आणि भरधाव वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Web Title: accident news just 2 seconds, the unexpected happened; the speeding car overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.