स्मृती इराणी यांच्या गाडीला अपघात, एक ठार तर दोन जण जखमी
By admin | Published: March 6, 2016 04:15 AM2016-03-06T04:15:01+5:302016-03-06T04:21:30+5:30
यमुना एक्स्प्रेस वेवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्नी स्मृती इराणी यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात इराणी यांना किरकोळ जखमी झाली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - वृंदावन येथील भाजपाच्या युवा मोर्चाचा कार्यक्रम आटोपून नवी दिल्लीला परतत असताना यमुना एक्स्प्रेस वेवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्नी स्मृती इराणी यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात इराणी यांना किरकोळ जखमी झाली आहे. तर या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती इराणी यांनी ट्विट केली. त्यांनी ट्विटद्वारे जखमींना बरे वाटावे यासाठी सर्वानी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार स्मृती इराणी वृंदावन येथून दिल्लीकडे परतत असताना यमुना एक्स्प्रेस वे जाम होता. त्यावेळी मोटरसायकल आणि होंडा सिटी यांच्यात झालेल्या अपघातामुळे मागे असणाऱ्या गाडय़ा एकमेकांना धडकल्या. त्या वेळी स्मृती इराणी यांची गाडी होंडा सिटीच्या मागे असल्यामुळे त्यांच्याही गाडीला अपघात झाला. या अपघातात आग्रा येथील कालिंदी विहार परिसरातील दुचाकीस्वार रमेशकुमार ठार झाला तर इतर दोन जण जखमी झाले आहेत.
या अपघातात स्मृती इराणी यांच्या गुडघ्याला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील ड्रायव्हर आणि दोन सुरक्षा रक्षकही किरकोळ जखमा झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
For all enquiring re my accident- I'm fine. Thank you for the concern and wishes.
— Smriti Z Irani (@smritiirani) March 5, 2016
There was a pile up of vehicles due to an accident on the expressway. Unfortunately the police vehicle before mine & my car also crashed.
— Smriti Z Irani (@smritiirani) March 5, 2016
Tried to help the injured who were lying on the road for quiet sometime and ensured they reach a hospital. Pray for their safety.
— Smriti Z Irani (@smritiirani) March 5, 2016
Good Samaritan Manoj Chopra and his wife also helped injured citizens. God bless them for their empathy and kindness.
— Smriti Z Irani (@smritiirani) March 5, 2016