Accident: भयंकर! अपघातानंतर ट्रकने स्कूटीला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले, ३ वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 02:59 PM2023-03-18T14:59:51+5:302023-03-18T15:00:10+5:30

Accident: उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर येथे एक भयानक अपघात घडला आहे. येथे एका ट्रकने स्कूटीला धडक दिली. त्यानंतर त्या अपघातग्रस्त स्कूटीला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले.

Accident: Terrible! After the accident, the truck carried the scooty for 500 meters, killing three people, including a 3-year-old child | Accident: भयंकर! अपघातानंतर ट्रकने स्कूटीला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले, ३ वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू 

Accident: भयंकर! अपघातानंतर ट्रकने स्कूटीला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले, ३ वर्षांच्या मुलासह तिघांचा मृत्यू 

googlenewsNext

उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर येथे एक भयानक अपघात घडला आहे. येथे एका ट्रकने स्कूटीला धडक दिली. त्यानंतर त्या अपघातग्रस्त स्कूटीला ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातामध्ये एका ३ वर्षांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, हा अपघात शुक्रवारी रात्री कटरा ओव्हरब्रिजजवळ झाला. कटरा पोलीस ठाणे क्षेत्रातील लालपूर गावातील रहिवासी रामदीन, त्यांची वहिनी सूरजा देवी आणि त्यांचा तीन वर्षांचा पुतण्या घरी जात होते. तेवढ्यात मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना टक्कर दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.

एसपी एस. आनंद यांनी सांगितले की, स्कूटी ट्रकमध्ये अडकली. त्यानंतर भरधाव ट्रकने या स्कूटीला जवळपास ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले. दरम्यान, पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात पाठवले. मात्र तिथे तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. 

Web Title: Accident: Terrible! After the accident, the truck carried the scooty for 500 meters, killing three people, including a 3-year-old child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.