माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने बचावले; घटनास्थळी पोलिस धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 03:40 PM2023-04-09T15:40:56+5:302023-04-09T15:45:52+5:30
गाडीला अपघात झाल्यानंतर ते दुसऱ्या गाडीने घिरायें गावातील नियोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या गाडीला रविवारी सकाळी अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या काडीचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, सुदैवाने त्यांना कुठलीही इजा पोहोचली नाही. नील गाय अचानक त्यांच्या गाडीसमोर आल्यामुळे हा अपघात झाला. याप्रकरणी स्वत: भूपेंद्रसिंह हुडा यांनी ट्विट करुन माहिती दिली. तसेच, मी व माझा संपूर्ण स्टाफ सुरक्षित असून नियोजित कार्यक्रमात मी सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भूपेंद्रसिंह गाडीतून जात असताना पुढील सीटवर बसले होते. यावेळी, माजी मंत्री जयप्रकाश, वीरेंद्र सिंह, धर्मवीर गोयत, नरेश सेलवाल हेही त्यांच्यासमवेत कारमध्ये होते. सुदैवाने अपघातात सर्वचजण सुखरुप आहेत. गाडीला अपघात झाल्यानंतर ते दुसऱ्या गाडीने घिरायें गावातील नियोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले.
आज हिसार जाते समय मेरा वाहन दुर्घटनाग्रस्त हो गया लेकिन ईश्वर की कृपा व आप लोगों की शुभकामनाओं से मैं और मेरा स्टाफ पूर्ण रूप से सुरक्षित है।
— Bhupinder S Hooda (@BhupinderShooda) April 9, 2023
मैं आगे के सभी तयशुदा कार्यक्रमों में शामिल होऊँगा।
हिसारचे पोलीस अधीक्षक गंगा राम पुनिया यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अचानक एक नील गाय रस्त्यावर आडवी आली. त्यावेळी, चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवले, पण धडक बसल्याने अपघात झाला. दरम्यान, भुपेंद्रसिंह हुड्डा यांनीही याबाबत माहिती देताना गाडीला एका जनावराने धडक दिली. मात्र, आम्हाला कुणालाही जखम झाली नसल्याचे सांगितले.