हिराखंड एक्स्प्रेसला अपघात, मृतांचा आकडा 36 वर

By Admin | Published: January 22, 2017 01:11 AM2017-01-22T01:11:23+5:302017-01-22T12:58:19+5:30

जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात झाला. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Accidental death to Himachal Pradesh Express, number of dead in 36 | हिराखंड एक्स्प्रेसला अपघात, मृतांचा आकडा 36 वर

हिराखंड एक्स्प्रेसला अपघात, मृतांचा आकडा 36 वर

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 22 -  जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा 36 वर पोहोचला असून, 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
   आंध्रपदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे इंजिनसह सात डबे रुळावरुन घसरुन अपघात झाला.  या अपघातात इंजिनच्या मागचा लगेजचा डबा, तसेच दोन जनरल डबे, दोन स्लिपरचे डबे, एक एसी थ्री टियर डबा  आणि एक सेकंड एसी डबा रुळावरून घसरला. हा अपघात शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास झाला असून यामध्ये आतापर्यंत 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, अपघातग्रस्त डबे रुळावरून हटवण्याचे काम सुरू असून, अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. 
दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेस (18448) चे इंजिनसह सात डबे रुळावरुन घसरुन हा अपघात झाला. घटनास्थळी डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे, अशी माहिती पूर्व कोस्ट रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जे. पी. मिश्रा यांनी दिली. तसेच, घटनास्थळी विविध ठिकाणांवरून 4 रिलीफ व्हॅन पाठविण्यात आल्याचे आणि प्रवाशी तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन तात्काळ सुरु करण्यात आली असल्याचे रेल्वे मंत्रालयानं टि्वट करून सांगितले आहे. दरम्यान, रेल्वेचे सुरक्षा आयुक्त हिराखंड रेल्वे अपघाताची चौकशी करतील. त्यासाठी ते अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी करतील, असे रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले.  
  
 रेल्वेमंत्र्यांकडून मदत जाहीर 
जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दु:ख व्यक्त केले असून, अपघातातील मृतांना दोन लाख, गंभीर जखमींना 50 हजार आणि  किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
 
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांना वाहिली श्रद्धांजली 
जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच  या अपघाताची चौकशी करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. 
 
 
 

Web Title: Accidental death to Himachal Pradesh Express, number of dead in 36

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.