अपघाताने केलेला सेक्स म्हणजे व्यभिचार नाही - गुजरात हायकोर्ट

By admin | Published: October 7, 2015 01:43 PM2015-10-07T13:43:27+5:302015-10-07T13:54:04+5:30

पती किंवा पत्नीचे चुकून दुस-या स्त्री किंवा पुरुषासोबत संबंध निर्माण झाले तर त्याला व्याभिचार म्हणता येणार नाही असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे.

Accidental sex is not adultery - Gujarat High Court | अपघाताने केलेला सेक्स म्हणजे व्यभिचार नाही - गुजरात हायकोर्ट

अपघाताने केलेला सेक्स म्हणजे व्यभिचार नाही - गुजरात हायकोर्ट

Next

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. ७ -  पती किंवा पत्नीचे चुकून अपघाताने दुस-या स्त्री किंवा पुरुषासोबत तात्पुरते शरीरसंबंध निर्माण झाले तर त्याला व्याभिचार म्हणता येणार नाही असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे. पण एखाद्या पती किंवा पत्नीने विचारपूर्वक दुस-या व्यक्तीसोबत एक रात्रदेखील शरीरसंबंध ठेवला तर मात्र त्याला व्यभिचार (adultery) म्हणता येईल असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील एका महिलेने पतीकडून पोटगी मिळावी यासाठी कोर्टात धाव घेतली होती. ही महिला सध्या दुस-या पुरुषासोबत राहत आहे. कनिष्ठ कोर्टाने याचा आधार तिला पोटगी देण्यास नकार दिला. मात्र तिच्या मुलाला पोटगी मिळू शकते असे कोर्टाने म्हटले होते. आकस्मिक परिस्थितीमुळे असलेला वन नाईट स्टँड किंवा तशाच एखाद्या परिस्थितीमुळे विवाहीत व्यक्तीचे दुस-यासोबत संबंध निर्माण झाले तर तो व्यभिचार ठरत नाही. पण विचारपूर्वक दुस-याशी संबंध निर्माण केले तर मात्र तो व्यभिचार ठरेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात महिला स्वेच्छेने तिच्या पतीला सोडून दुस-या पुरुषासोबत राहते. गर्भवती असतानाही तिने परपुरुषाशी संबंध ठेवले. त्यामुळे तिची ही कृती विचारपूर्वक आहे आणि त्यामुळे हा व्यभिचार ठरते असे सत्र न्यायालयाने म्हटले होते. तसेच तिला पोटगीसाठी पात्र ठरवण्यास नकार दिला होता. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात महिलेने गुजरात हायकोर्टात याचिका केली होती. हायकोर्टानेही सत्र न्यायालयाने मांडलेली व्याभिचाराची व्याख्या ग्राह्य ठरवत महिलेची पोटगीची मागणी फेटाळून लावली आहे.

Web Title: Accidental sex is not adultery - Gujarat High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.