रस्त्यावर कुठेही होऊ द्या अपघात; मिळणार कॅशलेस उपचार, केंद्र सरकार विचाराधीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 06:43 AM2023-12-06T06:43:05+5:302023-12-06T06:43:22+5:30
काही राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली आहे. अपघातानंतर पहिल्या तासात (गोल्डन अवर) उपचार देण्यावर भर आहे.
नवी दिल्ली : रस्त्यावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना देशभरात रोखरहित (कॅशलेस) उपचारांची सुविधा देण्याचा विचार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय करीत आहे. आगामी ३ ते ४ महिन्यांत ही सुविधा कार्यरत होऊ शकते.
रस्ते वाहतूक व महामार्ग सचिव अनुराग जैन यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. जैन यांनी सांगितले की, जगात सर्वाधिक अपघाती मृत्यू भारतात होतात. अपघातातील जखमींना मोफत आणि रोखरहित उपचारांची सुविधा देण्याची तरतूद मोटार वाहन कायदा २०२९ मध्येच करण्यात आलेली आहे. काही राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली आहे. अपघातानंतर पहिल्या तासात (गोल्डन अवर) उपचार देण्यावर भर आहे.