सीएमडींची नियुक्ती नियमानुसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:18 AM2017-08-17T00:18:35+5:302017-08-17T00:18:38+5:30

तेल व नैसर्गिक वायू कंपनीच्या (ओएनजीसी) मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून सध्याचे संचालक शशी शंकर यांचे नाव सर्वांत पुढे आहे.

According to the appointment of CMD | सीएमडींची नियुक्ती नियमानुसार

सीएमडींची नियुक्ती नियमानुसार

Next

नितीन अग्रवाल।
नवी दिल्ली : तेल व नैसर्गिक वायू कंपनीच्या (ओएनजीसी) मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून सध्याचे संचालक शशी शंकर यांचे नाव सर्वांत पुढे आहे.
मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यात अडचणी येत असून, त्यामुळे त्यांच्या नावावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. नियमांनुसार त्या पदावर नेमणूक होईल, असे तेल व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.
ओएनजीसीचे सीएमडी हे पद ३0 सप्टेंबरपासून रिकामे आहे. सार्वजनिक उद्योग नियुक्ती मंडळाने शशी शंकर यांच्या नावाला संमती दिली आहे. या पदासाठी ज्या अधिकाºयांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यातून शशी शंकर हेच उपयुक्त उमेदवार असल्याचे नक्की करण्यात आले.
मात्र मोदी सरकारच्या काळातच शशी शंकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तेल व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच शशी शंकर यांच्या आरोपांच्या विभागीय चौकशीच आदेश दिले होते. त्यामुळे त्यांना निलंबित करून, तसे शेअर बाजाराला कळविण्यातही आले. मात्र ९0 दिवसांच्या आत आरोपपत्र ठेवण्यात न आल्याने त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. निविदा प्रक्रियेत सिंगापूर, दुबई व फ्रान्सच्या कंपन्यांवर मेहरनजर दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

Web Title: According to the appointment of CMD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.