महापालिका निवडणुका वॉर्डानुसारच

By admin | Published: October 6, 2015 12:42 AM2015-10-06T00:42:09+5:302015-10-06T00:42:09+5:30

महापालिका निवडणुका वॉर्डानुसारच

According to municipal elections ward, | महापालिका निवडणुका वॉर्डानुसारच

महापालिका निवडणुका वॉर्डानुसारच

Next
ापालिका निवडणुका वॉर्डानुसारच
राज्य निवडणूक आयोग : निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती
नागपूर : महापालिका निवडणुका सध्यातरी वॉर्डानुसारच घेतल्या जात आहेत. राज्य शासनानेच यासंदर्भात निर्णय घेतला आहे. शासन यासंदर्भात दुसरा निर्णय घेत नाही तोपर्यंत तरी एक वॉर्ड एक प्रतिनिधी या धर्तीवर निवडणुका होतील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही वॉर्डनुसार होणार की प्रभाग पद्धतीनुसार होणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सहारिया यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. आजच्या घडीला निवडणूक झाली तर ती वॉर्ड पद्धतीनुसारच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु सोबतच पुढे शासन कोणता निर्णय घेईल, हे सांगता येत नाही, अशी पुष्टीही जोडली. राज्यात डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात होणार आहेत. या निवडणुकीमध्ये मतदान करता यावे म्हणून ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत १ जानेवारी २०१६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणार्‍या सर्व पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत. तसेच नाव, पत्त्यातील बदल, किंवा मृत व्यक्तीचे अथवा दुबार नावे वगळावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
बॉक्स..
इव्हीएम मशीनवर उमेदवारांचा फोटो
काही राज्यांमध्ये इव्हीएम मशीनवर उमेदवारांचे छायाचित्र वापरण्याचा प्रयोग सुरू आहे. महाराष्ट्रातही तसा प्रयोग करण्याचा विचार सध्या सुरू असल्याचे सहारिया यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
बॉक्स..
मुख्यमंत्र्यांसंदर्भात अद्याप कुठलीही तक्रार नाही
कल्याण-डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडे सध्या तरी अशी कुठलीही तक्रार आलेली नाही. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे कुठलेही उल्लंघन होणार नाही, यावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, तक्रार आल्यास नियमानुसार कारावई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: According to municipal elections ward,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.