Akhilesh Yadav: अखिलेश यादव उत्तर प्रदेश बाहेरही करणार भाजपशी दोन हात, असे आहे आकड्यांचे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:22 AM2022-08-30T10:22:32+5:302022-08-30T10:22:57+5:30
Akhilesh Yadav News: समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव आता केवळ उत्तर प्रदेशातच नाहीतर, मध्य प्रदेश व राजस्थानातही भारतीय जनता पक्षाशी दोन हात करतील.
- राजेंद्र कुमार
लखनौ : समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव आता केवळ उत्तर प्रदेशातच नाहीतर, मध्य प्रदेश व राजस्थानातही भारतीय जनता पक्षाशी दोन हात करतील. या दोन्ही राज्यांत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असून, तेथे आकाराला येणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून ते आपले उमेदवार रिंगणात उतरविणार आहेत. पक्षाने याची तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीत सपाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे.
आकड्यांचे गणित असे...
nमध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, छतरपूर, पन्ना आणि टीकमगडसह १५ जिल्ह्यांतील ८० विधासनभा क्षेत्रांत यादव निर्णायक भूमिकेत असल्याचे सपा नेत्यांचे म्हणणे आहे.
nराजस्थानच्या अलवरसह अनेक जिल्ह्यांतील जातीय गणित सपाच्या बाजूने आहे.
nयावेळी राजस्थानात बिगर भाजप व बिगर काँग्रेस अशी तिसरी आघाडी आकार घेऊ लागली असून, सपाची यात महत्त्वाची भूमिका आहे. सपाने राजस्थानात दोन डझनहून अधिक जागा लढविण्याची तयारी चालवली आहे.