...म्हणून डॉक्टर दोषी असू शकत नाही; राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे मत, डॅाक्टरांना केले दोषमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 10:01 AM2022-12-31T10:01:19+5:302022-12-31T10:01:54+5:30

ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर योग्य  काळजी घेण्यात डॉक्टर पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. 

according to the national consumer commission the doctors were exonerated | ...म्हणून डॉक्टर दोषी असू शकत नाही; राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे मत, डॅाक्टरांना केले दोषमुक्त

...म्हणून डॉक्टर दोषी असू शकत नाही; राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे मत, डॅाक्टरांना केले दोषमुक्त

Next

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: वैद्यकीय व्यवसायाला केवळ निर्णयाच्या चुकीमुळे किंवा  एका वाजवी उपचाराऐवजी दुसऱ्याला  प्राधान्य दिल्याबद्दल जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने केले आहे. 

१ नोव्हेंबर १९९८ रोजी अमरावती येथे विजय कुमार शिडीवरून  पडला आणि त्याच्या डाव्या हाताला  दुखापत झाली. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबई येथे   बॉम्बे हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये दाखल केले. ६ ऑगस्ट २००० रोजी अमरावती येथे त्याचा मृत्यू झाला. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर योग्य  काळजी घेण्यात डॉक्टर पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. 

ग्राहक आयोगाने तज्ज्ञांच्या समितीकडून  मत मागवले. त्यांनी  असे मत दिले की, उपलब्ध नोंदीनुसार, रुग्णाला मानक प्रोटोकॉलनुसार उपचार केले आहेत. हा अहवाल व सुप्रीम कोर्टाचे  निर्णय याचा आधार घेत आयोगाने डॅाक्टरांना दोषमुक्त केले. 

डॉक्टर कधी दोषी नसतात?

- जोपर्यंत डॉक्टर वैद्यक शास्त्राला मान्य उपचार करतात
- अधिक कुशल डॉक्टरांकडून वेगळा उपचार
- प्रत्येक प्रकरणात निष्काळजीपणा गृहीत धरता येणार नाही.
- उपचार पध्दतीचा निर्णय चुकला, पण डॉक्टरांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: according to the national consumer commission the doctors were exonerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर